Press "Enter" to skip to content

कोकण पुत्र डॉ.संजय कदम यांना ‘कृषीभूषण एक्सलन्स’ पुरस्कार

कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा

कोकण पुत्र डॉ.संजय कदम यांना ‘कृषीभूषण एक्सलन्स’ पुरस्कार

मुंबई :- कृषिभूषण महाएफपीओस्टार्टअप फेडेरेशन, नाशिक यांच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर, कृषिभूषण एक्सलन्स अवॉर्ड २०२४ चा उत्कृष्ठ कृषी विस्तारकार्याबद्दल दिला जाणारा पुरस्कार डॉ संजय कदम यांना प्रदान करण्यात आला.यावेळी त्यांना सन्मानपत्र स्मृतिचिन्ह आणि सुवर्णपदक देत गौरविण्यात आले. डॉ. कदम हे वैरण विकास अधिकारी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय गोरेगाव येथे कार्यरत आहेत.

डॉ कदम यांनी जवळजवळ २० वर्षे शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत, चारा पिके लागवड तंत्रज्ञान यावर मराठी आणि इंग्रजीत अनेक पुस्तके लिहली आहेत. तसेच त्यांचे आकाशवाणी, दूरदर्शन वाहिनीवर नेहमीच कार्यक्रमाच्या माध्यमातून माध्यमातून प्रसार व प्रचार केला. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत संपूर्ण राज्यभर चारा पिकांची शास्त्रोक्त लागवड कशी करावी याबाबत प्रशिक्षण घेऊन प्रात्यक्षिक दाखविले . तसेच त्यांचे या विषयावर राष्ट्रीय पातळीवरील जर्नल मध्ये अनेक शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत.

डॉ. संजय कदम अगदी गरीब घरातून संघर्ष करत इतवर पोहचले आहेत. ‘कृषीभूषण एक्सलन्स’ हा पुरस्कार मिळाल्याने काम करण्यासाठी आणखी ऊर्जा मिळते, असे डॉ .कदम यांनी सांगितले. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.

One Comment

  1. Mike Green April 14, 2024

    Hi

    I have just took an in depth look on your kokandarpan.com for the current search visibility and saw that your website could use a boost.

    We will increase your ranks organically and safely, using only state of the art AI and whitehat methods, while providing monthly reports and outstanding support.

    More info:
    https://www.digital-x-press.com/unbeatable-seo/

    Regards
    Mike Green

    Digital X SEO Experts

Leave a Reply

Your email address will not be published.