Press "Enter" to skip to content

जागतिक आरोग्यदिनानिमित्त आरोग्यम खारघर कार्यशाळा ! ७ एप्रिल जागतिक आरोग्यदिनी कार्यक्रम ! अनेक नामांकित डोक्टरांशी थेट संवाद !

जागतिक आरोग्यदिनानिमित्त आरोग्यम खारघर कार्यशाळा !
७ एप्रिल जागतिक आरोग्यदिनी कार्यक्रम !
अनेक नामांकित डोक्टरांशी थेट संवाद !
कोकण दर्पणचे आयोजन ! विविध सामाजिक संस्थांचा सहभाग !

पनवेल, प्रतिनिधी : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून कोकण दर्पण मीडिया ग्रुपच्या माध्यमातून ७ एप्रिल २०२४ रोजी आरोग्यम खारघर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खारघर सेक्टर १२ येथील उत्कर्ष हॉलमध्ये सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी सदर कार्यक्रम संपन्न होणार आहे. या आरोग्य कार्यशाळेत खारघर , पनवेल, नवी मुंबई शहरातील अनेक नामांकित डॉक्टर्स उपस्थित राहणार आहेत. आपल्या आरोग्यविषयीचे प्रश्न आपणास थेट विचारता येणार आहेत.

खारघर येथे आयोजित केलेल्या आरोग्यम खारघर कार्यशाळेचे उदघाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ आनंद गोसावी, जेष्ठ हृदयरोग तज्ज्ञ तथा शुश्रूषा हार्ट केअर ग्रुपचे मेडिकल डायरेक्टर डॉ संजय तारळेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. जेष्ठ साहित्यिक डॉ जी के डोंगरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम संपन्न होणार आहे. या आरोग्य कार्यशाळेत ऑर्थोपेडिक सर्जन तथा खारघर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. सरबजीत कोहली, बालरोग तज्ज्ञ तथा सान्वी चाईल्ड हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ सतीश शहाणे, स्त्रीरोग तज्ज्ञ तथा ओर्नेट हॉस्पिटलच्या मेडिकल डायरेक्टर डॉ शुभांगी अदाटे, एच सी ए एच केअर सेंटरचे कन्सल्टन्ट फिजिशियन मेडिसिन अँड रिहॅबिलेशन डॉ आस्तिक भट्ट, अमृतवेल आयुर्वेदच्या संचालिका तथा आयुर्वेदाचार्या डॉ. ज्योती जाधव, प्लास्टिक सर्जन तथा आर एन हेल्थ सेंटरच्या डायरेक्टर डॉ रीदिमा सचदेवा नागरिकांना आरोग्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

आरोग्यम खारघर कार्यक्रमासाठी कोकण रहिवाशी संघ आणि उत्कर्ष हॉलचे संचालक शशिकांत जाधव प्रमुख संयोजक आहेत. मराठा समाज खारघर, लोटस फाउंडेशन, श्रीपुष्प फाउंडेशन,वसंतराव चॅरिटेबल ट्रस्ट, कमलज्योती फाउंडेशन , अटळ फाउंडेशन, शाश्वत फाउंडेशन, खारघरचा राजा. राष्ट्रसेवक, संवाद मंच , खान्देश विकास फाउंडेशन , सुराज्य फाउंडेशन, शिवबंधन प्रतिष्ठाण, शुभारंभ सामाजिक संस्था , युवा प्रेरणा सामाजिक संस्था , श्री साई गणेश मंडळ, खान्देश रहिवाशी संघ, जागृत फाउंडेशन, श्री शंभूराजे मित्र मंडळ या खारघरमधील सामाजिक संघटनांनी सहभाग दर्शविला आहे.

खारघरवासियांमध्ये आरोग्याविषयी जागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या आरोग्यम खारघर या आरोग्य कार्यशाळेमध्ये खारघरवासियांनी सहकुटुंबीय मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कोकण दर्पणचे संपादक संजय महाडिक यांनी केले आहे.

7 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.