२३ मार्च रोजी खारघर येथे राष्ट्रीय कवी संमेलन !
जागृत फाऊंडेशनचे आयोजन ! अध्यक्ष ज्ञानेश्वर खरपुरिया यांचा पुढाकार
पनवेल, प्रतिनिधी : जागृत फाऊंडेशन-खारघर, नवी मुंबईतर्फे दरवर्षी होणारे राष्ट्रीय कवी संमेलन यंदा महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येत्या शनिवार 23 मार्च 2024 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपासून एपीजे शाळेसमोर, सेक्टर 21 खारघर येथे सचिन तेंडुलकर मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात देशातील विविध प्रांतातील अखिल भारतीय स्तरावरील नामवंत कवींना आमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचा उद्देश हिंदीचा प्रचार करणे तसेच विविध संस्कृतींमध्ये पूल बांधणे हा आहे. जागृत नाशिक- जागृत भारतचे प्रवक्ते स्वामी श्रीकांतानंद जी नाशिक त्रेभकेश्वर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
जागृत फाऊंडेशन नवी मुंबई, खारघर या संस्थेतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जागृत फाउंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खरपुरिया यांनी केले आहे. आणि सचिव शिवम सिंग यांनी हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असल्याचे सांगितले.
Be First to Comment