सत्याग्रह कॉलेज येथे महाड चवदार तळे क्रांती दिन साजरा !
पनवेल, प्रतिनिधी : महाड चवदार तळे क्रांतीदिनी खारघर येथील सत्याग्रह कॉलेजमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाड सत्याग्रह दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. २० मार्च १९२७ रोजी महाड चवदार तळे सत्याग्रह घडला होता. महाड चवदार तळे सत्याग्रह हा मानवतेचा – समतेचा संगर होता. जगातील पहिला मानवी न्यायहक्काचा पाण्यासाठीचा संगर होता. सदर कार्यक्रमाला माजी आमदार बाळाराम पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक – अध्यक्ष डॉ जी के डोंगरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रा. प्रवीण मोरे, संपादक संजय महाडिक उपस्थित होते.
Be First to Comment