“मुंबईत मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावरून रेल्वेद्वारे करोडो प्रवासी प्रवास करतात. यांच्यासह देशातील प्रवाश्यांचा प्रवास सुखद व्हावा, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या व प्रवासी महिलांच्या सुरक्षेची हमी क़ायम संरक्षित रहावी तसेच रेल्वे पोलीस यंत्रणेला कर्तव्य पार पडताना अधिक बळ मिळावे. यासाठी गेले ५० वर्षाहून अधिक काळ २६१ भजन मंडळांकडून प्रार्थना केली जात आहे. ही प्रार्थना सद्भावनेने चाकरमानी रेल्वे प्रवासी हे रेल्वे प्रवासादरम्यान करतात. सदर “रेल्वे प्रवासी भजन मंडळे” यांच्यामार्फत आध्यात्मातून सकारात्मक आचार आणि विचारांची परिवर्तनरुपी समर्पित समाजसेवेद्वारे संपूर्ण रेल्वे यंत्रणेला संरक्षण कवच निर्माण करीत आहेत. रेल्वे प्रवासी भजन मंडळांच्या या अलौकिक समाज सेवेची परंपरा अबाधित राहावी म्हणून रेल्वे प्रवासी भजन मंडळाना स्वतंत्र “सदभावना बोगी” प्राधान्याने आरक्षित करावी. तसेच स्वतंत्र बोगी निर्माण करण्यासाठी कायदा करावा. – दशरथ भगत.
भक्ती -शक्तीच्या संयोजनातून “रेल्वे प्रवासी व रेल्वे च्या सुरक्षेसाठी,
चला रामनाम गाऊ या” या उद्दिष्टातुन हार्बर, मध्य व पश्चिम रेल्वे प्रवासी
भजन स्पर्धा वाशी येथे संपन्न !
नवी मुंबई , प्रतिनिधी : नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी छत्रपती शिवराय भजन मंडळ, वाशी आणि श्री संत तुकाराम महाराज रेल्वे प्रवासी भजन मंडळ, वाशी यांच्या संयुक्त विद्यमानाने मध्य, पश्चिम व हार्बर या तिन्ही मार्गांवरील एकूण २६१ रेल्वे प्रवासी भजन मंडळाच्या सहकार्याने “रेल्वे प्रवासी व रेल्वे च्या सुरक्षेसाठी, चला रामनाम गाऊ या” उद्दिष्टातुन प्रथमच भव्य रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा रविवार दिनांक १७ मार्च रोजी वाशी रेल्वे स्टेशन जवळील फँटासिया बिझिनेस पार्क येथील साई हेरिटेज हॉल येथे सकाळी ०९ वाजल्यापासून रात्रौ ०९ वाजेदरम्यान हरिनामाच्या गजरात स्पर्धेतील पार पडली. सकाळी ०९ वाजता वाशी रेल्वे स्टेशन येथे सेवेवर असणाऱ्या रेल्वे मोटरमन यांचा सन्मान करून वाशी रेल्वे स्टेशन ते कार्यक्रम स्थळापर्यंत हरीनाम दिंडी काढण्यात आली होती.
या स्पर्धेतील सहभागी एकूण २६ मंडळे व विजेत्या भजन मंडळान्स ना रोख रक्कम व सन्मानचिन्हे देऊन नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील नामवंत उद्योजक डॉ. सुरेशजी हावरे यांच्या हस्ते व आयोजक दशरथ भगत, माजी नगरसेविका फशीबाई करसन भगत व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.
या संपूर्ण भजन स्पर्धेदरम्यान परीक्षक म्हणून गायनचार्य ह.भ.प वाघमारे गुरुजी व मृदूंगमणी ह.भ.प सदानंद गोळे महाराज यांनी समर्पित सेवा दिली.
स्पर्धेदरम्यान झालेल्या सत्कार समारंभात आयोजक दशरथ भगत यांनी उपस्थित मान्यवरांना व भजनप्रेमी परिवाराला त्यांना प्रतिदिन रेल्वे प्रवासात सहन कराव्या लागणाऱ्या विविध समस्यां व मागण्यांवर प्रकाश टाकला, व त्या समस्यांचे मागणीत रूपांतर करून सर्वधर्मीयांचा आदर राखणाऱ्या आगामी केंद्र सरकार कडून त्याची पूर्ती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करीत सुरेशजी हावरे व स्वतः भगत यांनी या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशिल राहून रेल्वेतील भजनी मंडळींना मोटरमनच्या मागील डब्ब्यात किमान २५ सीट्स चे आरक्षण टाकून त्या बोगीत पार्टीशन करून त्यांस हक्काची जागा मिळवून देऊ, ज्या बोगीला सदभावना बोगी म्हणून विशेष नामरूपी आरक्षण असेल, तसेच तिन्ही मार्गांवर प्रवासा दरम्यान आपल्या कर्तव्यासाठी जाताना- येताना भजन गाणाऱ्या चाकरमान्यांच्या या रेल्वे प्रवासी भजन परंपरेस ५० वर्षेहून अधिक वर्षे उलटून गेलेली आहेत. ह्या नामस्मरणरुपी कार्यात निव्वळ भक्ती नसून रेल्वे प्रवासी ज्यात विशेषतः महिला भगिनींसह अन्य प्रवास्यांची सुरक्षा व रेल्वेची सुरक्षा व स्वछता अबाधित ठेवण्यात रेल्वे प्रवासी भजनी मंडळानचे मोठे योगदान आहे.
भक्तीतून सामाजिक दायित्व जपणाऱ्या या सर्वच धार्मियांच्या रेल्वे प्रवासी भजन परंपरेस कायद्याने संरक्षित करण्यासाठी आवश्यक तो पत्रव्यवहार व पाठपुरावा नवी मुंबईचे सर्वमान्य नेतृत्व माजी मंत्री लोकनेते आमदार गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून केला जाईल, असे आश्वासन स्पर्धेचे आयोजक तथा नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी उपस्थित भजनी मंडळींना व त्यांच्या परिवारातील सदस्यांना दिले.
ह.भ.प हनुमंत महाराज तावरे, सुरेश कारंडे, जयराम पवार, ह.भ.प ईश्वर मत्रे महाराज, आत्माराम सुर्वे, राजेश पालकर, वसंत प्रभु, चंद्रकांत महाडिक, अनिल मोरे, विनय धाडवे, राजाराम पाटील आदींनी सदरहू भजन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रेल्वे प्रवासी भजन महासंघाचे तिन्ही लाईन चे समिरी सदस्य व संलग्न मंडळांचे पदाधिकारी यांनी अनमोल भूमिका पार पाडली, अशी माहिती शैलेश घाग यांनी दिली.
Thanks, +
_________________
iddaa sonuçları bilyoner – telefonda iddaa nasıl oynanır
Breaking News, Pictures, Videos, and Special Reports from The Star News Today
https://www.thestarnewstoday.com/