Press "Enter" to skip to content

सुधागड शाळेने घेतला विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी पुढाकार ! प्रतिबंधात्मक उपचारावर भर द्यावा : डॉ शिल्पा देसाई !

सुधागड शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी !
मुलांच्या प्रतिबंधात्मक उपचारावर भर द्यावा :
डॉ शिल्पा देसाई यांचे आवाहन !

पनवेल, प्रतिनिधी : C4 एज्यु ग्लोगल आणि कोपरा – खारघर येथील सुधागड शाळा आणि नितीन पामकर यांच्या पुढाकाराने शाळेतील विद्यार्थी व पालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी शाळेत आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात विद्यार्थ्यांची शारीरिक चाचणी व बौद्धिक चाचणी करण्यात आली. यावेळी आरोग्यमानस शास्त्रज्ञ डॉ शिल्पा देसाई यांनी मुलांच्या आहार पद्धती, आरोग्याबाबत पालकांना मार्गदर्शन केले. मुलांच्या प्रतिबंधात्मक उपचारावर भर द्यावा असे आवाहन यावेळी डॉ शिल्पा देसाई यांनी पालकांना केले. यावेळी पनवेल मनपाचे माजी नगरसेवक नरेश ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यपिका मंजुळा गावित , विद्या आमरे, नितीन पामकर यांनी विशेष मेहनत घेतली

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published.