Press "Enter" to skip to content

खासदार श्रीरंग बारणे यांचे दातृत्व, वाढदिवशी तरुणाला किडनी ट्रान्सफरसाठी एक लाखाची मदत

खासदार श्रीरंग बारणे यांचे दातृत्व,
वाढदिवशी तरुणाला किडनी ट्रान्सफरसाठी एक लाखाची मदत

पिंपरी – मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचे दातृत्व पुन्हा एकदा समोर आले आहे. बारणे यांनी वाढदिवसादिवशी काळेवाडीतील एका गरजु कुटुंबातील तरुणाला किडनी ट्रान्सफर (किडनी प्रत्यारोपण)साठी एक लाखाची वैयक्तिक मदत केली.

काळेवाडीत राहणा-या अनिल पालांडे या तरुणाला एक लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश खासदार बारणे, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विश्वजीत बारणे यांच्या हस्ते देण्यात आला. खासदार बारणे यांचा वाढदिवस शुक्रवारी विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा झाला. दरवर्षी वाढदिवसानिमित्त बारणे यांच्यामार्फत आरोग्य शिबिर घेतले जाते. गरजु रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. काळेवाडी येथे राहणारा अनिल याला किडनी ट्रान्सफर करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येणार आहे. ही बाब युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विश्वजीत बारणे यांना समजली. त्यांनी तत्काळ एक लाख रुपये देण्याचे मान्य केले. खासदार बारणे यांच्या वाढदिवसादिवशी एक लाख रुपयांचा धनादेश अनिल याच्याकडे सुपूर्द केला.

अनिल पालांडे या तरुणाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. किडनी ट्रान्सफरसाठी मोठा खर्च आहे. त्याला वैयक्तीक एक लाख रुपयांची मदत केली. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनही मदत मिळवून देणार असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.