Press "Enter" to skip to content

पनवेलच्या प्रशासकीय भवनाची आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी; भवनाचे काम प्रगतिपथावर

पनवेलच्या प्रशासकीय भवनाची आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी; भवनाचे काम प्रगतिपथावर

पनवेलमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणून प्रशासकीय भवन उभारण्यात येत आहे. या भवनाचे काम प्रगतिपथावर असून आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी  याची पाहणी करून आढावा घेतला.
शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी असावीत, जेणेकरून नागरिकांच्या वेळ व पैशांची बचत होईल या उद्देशाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यातून पनवेल शहरातील पूर्वीच्या तहसीलदार कार्यालयाच्या जागेवर प्रशासकीय भवन साकारत आहे. तळमजला व तीन मजली अशा या भवनाचे काम पूर्णत्वाच्या दिशेने आहे. या कामाची आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी पाहणी केली आणि याबाबतची माहिती अधिकारी वर्गाकडून घेतली.
या पाहणीवेळी तहसीलदार विजय पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मिलिंद कदम, विद्युत विभाग उपअभियंता श्रीमती जाधव, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगत आदी उपस्थित होते. प्रशासकीय भवनाचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण करून एप्रिल किंवा मे महिन्यात उद्घाटनानंतर हे भवन नागरिकांसाठी खुले होईल, असे यावेळी अधिकारी वर्गाने सांगितले.

3 Comments

  1. kalyanmatka.com February 26, 2026

    Alright, so I checked out kalyanmatka.com. Seems like your basic Matka site. Nothing too fancy, but if you’re into that sort of thing, give it a whirl! kalyanmatka.com

  2. ku19net February 26, 2026

    Just gave KU19net a go. So far so good! Games are smooth, and the site’s easy to navigate. Thinking I might stick around for a bit. Check it out at ku19net

  3. jogar na blaze February 26, 2026

    Time for some jogar na blaze! Let’s see if this is where the fun is at. Brazilian luck, here I come! Vamos nessa! jogar na blaze

Leave a Reply

Your email address will not be published.