कोकण दर्पण १३ वा वर्धापन दिन व राज्यस्तरीय
पुरस्कार सोहळ्याचे नवी मुंबईत भव्य आयोजन !
२८ जानेवारी रोजी आगरी कोळी सांस्कृतिक भवन सोहळा !
नवी मुंबई, प्रतिनिधी : कोकणाचे मुखपत्र कोकण दर्पण वृत्तपत्राचा १३ वा वर्धापन दिन आणि राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळ्याचे भव्य आयोजन २८ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आले आहे. नेरुळ, नवी मुंबई येथील आगरी कोळी सांस्कृतीक भवन येथे सायंकाळी ४ वाजता सदर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर सोहळ्याचे उदघाटन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि माजी तथा लोकनेते मंत्री गणेश नाईक यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. सदर सोहळ्याला आ. प्रशांत ठाकूर,आ.बाळाराम पाटील,आ. महेश बालदी, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत , माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप तिदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. माजी सिडको संचालक नामदेव भगत, माजी उप महापौर अशोक गावडे, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, संपादक शरद सावंत, जि डी गोवारी कॉलेजचे चेअरमन सूरदास गोवारी, कॉलनी फोरम नेते मधू पाटील, डॉ. संजय तारळेकर, डॉ अभय शेटे, शिवसेना नवी मुंबई शहर प्रमुख विजय माने, शिवसेना खारघर शहर संघटक इम्तियाज शेख आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जेष्ठ साहित्यिक डॉ जी के डोंगरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सदर सोहळा संपन्न होणार आहे.
कोकण दर्पण वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांना समाज दर्पण पुरस्कार, कामगारनेते महेंद्र घरत यांना भूमिपुत्ररत्न पुरस्कार, पोलीस अधिकारी मानसिंग पाटील यांना शहीद योगेश पाटील शौर्यश्री पुरस्कार, नवी मुंबई महापालिका माजी विरोधी पक्षनेता दशरथ भगत यांना नवी मुंबई गौरव पुरस्कार, पनवेल मनपा माजी विरोधी पक्षनेता प्रितम म्हात्रे यांना पनवेल गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच जेष्ठ पत्रकार विश्वरथ नायर यांना पत्रकारितेचा डॉ बाबासाहेब आंबेडकर समता पुरस्कार, शिक्षणकर्मी कमलेश पटेल यांना शिक्षण दर्पण पुरस्कार, उद्योजक ज्ञानेश्वर खरपुरिया यांना उद्योग दर्पण पुरस्कार, हृदयरोगतज्ज्ञ डॉ . केशव काळे यांना हृदया पुरस्कार, चित्रपट निर्माता विलास चव्हाण यांना कोकणरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण दर्पण मीडिया ग्रुपचे संपादक प्रा. संजय महाडिक यांनी दिली. सोहळ्यानिमित्ताने गायक मुकेश गुप्ता आणि कामिनी गुप्ता यांचा सरगम- सुरो कि दुनिया हा गजल व कव्वाली गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ए आय आय आय टी एस संयोजित अंतर महाविद्यालयीन नृत्य स्पर्धा देखील होणार आहे. सोहळ्याचे सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार तथा निवेदक मुकेश शिंदे करणार आहेत. सदर सोहळ्याचे संयोजन कोकण रहिवाशी संघ आणि नवी मुंबई पनवेल मधील विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी केले आहे. सदर सोहळ्याला नवी मुंबई , पनवेल, उरण तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कोकण दर्पण मीडिया ग्रुपचे संपादक तथा कोकण रहिवाशी संघाचे अध्यक्ष प्रा. संजय महाडिक यांनी केले आहे.
कोकण दर्पण राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी


















Be First to Comment