Press "Enter" to skip to content

ओमसिटी चॅरिटेबल क्लिनिकचा कळंबोली येथे शुभारंभ ! आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते ओमसिटी क्लिनिकचे उदघाट्न !

ओमसिटी चॅरिटेबल क्लिनिकचा कळंबोली येथे शुभारंभ !
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते
ओमसिटी क्लिनिकचे उदघाट्न !

पनवेल, प्रतिनिधी : ओमसिटी चॅरिटेबल क्लिनिकचा कळंबोली येथे नुकताच शुभारंभ झाला. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते ओमसिटी क्लिनिकचे उदघाट्न संपन्न झाले. यावेळी पनवेल मनपा सभागृहनेते परेश ठाकूर उपस्थित होते.

ओमसिटी फाउंडेशन चॅरिटेबल क्लिनिकचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या पुढाकाराने आरोग्यसेवेचा सामाजिक उपक्रम सुरु करण्यात आला आहे. ओमसिटी फाउंडेशन चॅरिटेबल क्लिनिकचे आरोग्य सेवेत योगदान म्हणजे समाजासाठी मोठी उपलब्धी आहे. दरम्यान कळंबोली येथे दुसऱ्या शाखेचा शानदार शुभारंभ संपन्न झाला. समाजासाठी आरोग्य सेवा पुरविण्याचा ओमसिटी क्लिनिकचा संकल्प आहे.

ओमसिटी चॅरिटेबल क्लिनिकद्वारा सर्वसामान्यांना 30 रुपयांमध्ये आरोग्य तपासणीची सुविधा मिळते. एवढ्या कमी फीमध्ये आरोग्य तपासणी करणारे हे क्लीनिक आहे. सर्व ब्लड टेस्ट, ईसीजी, एक्सरे ,सोनोग्राफीवर 50% सवलतीमध्ये केले जातात. दरम्यान , स्वस्त आणि दर्जेदार आरोग्य सुविधा देऊन समाजातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा करण्याचा आमचा निर्धार आहे , सदर कार्यात आम्ही नक्कीच सातत्य ठेवू , असा विश्वास ओमसिटी फाउंडेशन चॅरिटेबल क्लिनिकचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केला.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published.