Press "Enter" to skip to content

दीपक शिंदे यांची मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य पदी निवड !

दीपक शिंदे यांची मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य पदी निवड !

पनवेल, प्रतिनिधी : कोकण रहिवासी संघ, खारघर शहर अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी खारघर मंडलाचे सरचिटणीस दीपक शिंदे* यांची खारघर रेल्वे स्थानक सल्लागार समिती सदस्य म्हणून निवड झाली.

2024 या वर्षासाठी असलेले नियुक्त पत्र मध्य रेल्वे वाणिज्य विभागाचे जितेंद्र यादव यांच्या वतीने खारघर रेल्वे स्टेशन अधिकारी मानसी नाईक यांच्या हस्ते प्राप्त झाले.

खारघर मधून मुंबई व ठाण्याला जाणाऱ्या प्रवाशांची व खारघर कडे येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या पाहता खारघर स्टेशन वरील असलेल्या असुविधा, प्रवाशांना होणारा मानसिक त्रास, रेल्वे पार्किंगची दुरावस्था, खारघर सीएमटीएम थेट रेल्वे, अनिधिकृत फेरीवाले असे अनेक विषय दीपक शिंदे चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहेत.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published.