Press "Enter" to skip to content

हजारोंच्या साक्षीने ‘रामबाग’ चा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा; लहानग्यांपासून ज्येष्ठांची उपस्थितीने ”रामबाग’ झाले नंदनवन

हजारोंच्या साक्षीने ‘रामबाग’ चा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा; लहानग्यांपासून ज्येष्ठांची उपस्थितीने ”रामबाग’ झाले नंदनवन

पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील सुंदर बाग आणि आबालवृद्धांचे आकर्षण असलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील ‘रामबाग’ या उद्यानाचा पहिला वर्धापन दिन सोहळा हजारो उद्यानप्रेमींच्या साक्षीने मोठ्या दिमाखदारपणे साजरा झाला. नयनरम्य वातावरण, आकर्षक विद्युत रोषणाई, उत्तम नियोजन आणि लहानग्यांपासून ज्येष्ठांची उपस्थितीने रामबाग नंदनवन प्रमाणे फुलले होते. … आणि त्यातच पारंपरिक आगरी-कोळीगीतांच्या बहारदार कार्यक्रमाने वातावरणात स्फूर्ती आणली होती. स्वतःच्या संपत्तीतून लोकांच्या सेवेसाठी उभारलेली ‘रामबाग’ हि वास्तू न्हावे परिसरातील ग्रामस्थांच्या अभिमानाची ठरली आहे, त्यामुळे ग्रामस्थांकडून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा हृदय सत्कार करून त्याच्याप्रती आदर व्यक्त करण्यात आला.
या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी मंत्री व विद्यमान आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, डेल्टाचे नितीन पटेल, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, सरपंच विजेंद्र पाटील, उपसरपंच राजेश म्हात्रे, माजी सरपंच हरेश्वर म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते. सोहळ्यास लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, कृष्णाशेठ ठाकूर, अरुण ठाकूर, प्राचार्य गणेश ठाकूर, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सीता पाटील, यांच्यासह ठाकूर कुटुंबिय, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, तसेच पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे श्री म्हसेश्वर मंदिर कमिटीचे अध्यक्ष सी.एल. ठाकूर आणि रामबाग व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सागर ठाकूर, स्वप्निल ठाकूर यांनी स्वागत केले. यावेळी न्हावे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या वीरभूमी इंटरटेंमेंट (घणसोलीकर) प्रस्तुत ७० कलाकारांचा संच असलेल्या पारंपरिक आगरी-कोळीगीतांच्या बहारदार कार्यक्रमाने रंगत आणली होती.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी भाषणात सांगितले कि, माणूस जन्माला येतो परंतु मृत्यूपश्चात कीर्ती करून जात असतो आणि त्याचे नाव हे इतिहासात अजरामर होत असते त्याच रूपाने सच्चा सुपुत्र, कामाचे कर्तृत्व असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मनोभावे सेवेच्या माध्यमातून रामबागची निर्मिती झाली आहे. नावात त्यांच्या ‘राम’ तसे कर्तृत्वात ‘राम’ आहे. त्यांनी ज्ञानार्जनाचे काम केले आहे. वाशीला माझी शाळा आणि त्या शाळेत त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले ते भाग्य आम्हाला मिळाले. आणि मी त्यांचे काम कर्तृत्व स्वतः बघितले आहे. त्यांचे कर्तृत्व इतके झाले कि थेट दिल्लीत खासदार म्हणून गेले. काम करण्याचे धाडस लागते, तशी हिंमत लागते आणि तेवढे दातृत्व पण लागते. या ठिकाणी त्यांनी जी सेवा केली आहे त्याबद्दल आम्ही सर्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे ऋणी आहोत. आम्ही अशाच प्रकारचा एक सुंदर मंदिर बनवला होता पण तांत्रिक अडचणीमुळे सुंदर वास्तूला सर्वच लोकं मुकली. त्यामुळे लोकांसाठी बनवलेली रामबाग हि सुंदर वास्तू अधिक फुलण्यासाठी लोकांनीही प्रयत्नशील राहिले पाहिजे असे सांगतानाच हा सोहळा यापुढे या पेक्षाही मोठा झाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुंबई जवळ आली आहे त्यामुळे तेथील लोकं येथे येणार आहेत. आज गुगलवर क्लिक केले तर या रामबाग या ठिकाणी येत असते आणि हि आपल्या सर्वांची या परिसराची ओळख आहे. असे नमूद करतानाच ग्रामपंचायतीने रामबाग नावाचा ठराव करावा असे सूचित करून या ठिकाणी येण्याकरिता नवी मुंबई महापालिका परिवहन बससेवा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. तसेच काम करणाऱ्यांवर नेहमी टीका होत असते पण तुम्ही टीकेला न जुमानता काम करत असता हे तुमचे मोठेपण आहे, असेही डॉ.संजीव नाईक यांनी अधोरेखित केले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हंटले कि, देवाची कृपा त्यामुळेच या जागेवर आपल्या सर्वाना या ठिकाणी चालता येत आहे. ग्रामस्थांच्या आग्रहास्तव या देऊळाला रस्ता झाला आणि मधल्या कालावधीमध्ये काही डेब्रिज विकणाऱ्यांनी या ठिकाणी भराव केला. या ठिकाणी मंदिर परिसरातील उधाणाचा पाणी नियमित नाही पण पौर्णिमा अमावस्या वेळी यायचा. देवाने प्रेरणा दिली म्हणून या ठिकाणी सुंदर मैदान, तलाव, सुंदर बाग झालेली आहे. माझ्या आयुष्यामध्ये सर्वात महत्वाचे काम शाळा कॉलेजची निर्मिती, राज्यातील अनेक जिल्ह्यातील शांळांना मदत अशी कामे झाली असली तरी सुद्धा त्या पेक्षाही जास्त महत्वाचे काम जिथे आपला जन्म झाला, आपली जन्मदाती आई जशी असते तशी हि मातृभूमी आहे ती प्यारी आहे आणि तिच्यासाठी काही काम करू शकलो त्याचा मला मोठा आनंद आहे. येथे भेट देणाऱ्यांना समाधान आणि त्यांच्या चेहऱ्यावर मनमुराद आनंद दिसतो यात आपल्याही आनंद होतो. टीका करणारे करत राहतील पण येथे भेट देणारी सगळी लोकं हे चांगले आहे कि वाईट हे सांगतील. सिडकोने या बागेची देखभाल दुरुस्ती काम करायला पाहिजे होते या संदभात आमदार महेश बालदी यांनी लेखी पत्र दिले आहे. हि बाग आमच्या करिता बनवलेली नाही हि सिडकोच्या नावावर आहे आणि त्यांच्याच नावावर राहणार आहे. सिडकोची इच्छा असेल तर हि बाग सिडकोने विकसित करावी करावी, असे सांगून हि बाग माझी नाही माझ्या नावाचा उल्लेख नाही रामबाग हे नाव देऊळ कमिटीचे अध्यक्ष सी. एल. ठाकूर यांनी दिलेले आहे, असे अधोरेखित केले. साहजिकच जो काम करतो त्याचे नाव लावले जाते, तशाप्रकारे नाव देण्यात आले. पण बाकी त्याच्यामध्ये एक टक्काही मालकी हक्क नाही. आणि हि रामबाग या गावाचे लौकिक वाढवणारी असून भविष्यकाळामध्ये प्रेक्षणीय स्थळ करण्याच्या दृष्टीने या रामबागचे व्यवस्थापन ताब्यात घेऊन अधिक सुंदर करावे. जर सिडको तयार होत नसेल तर न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील यांनी सांगितले आहे कि, ग्रामपंचायतीच्या ताब्यात द्या आम्ही बाग सांभाळतो. त्या दृष्टीने एखाद्या सामाजिक संस्थेच्या ताब्यात देऊन ती देखभाल दुरुस्ती व विकसित करेल. ग्रामपंचायत स्वतः करेल किंवा ती संस्था करून घेईल पण सिडकोवर बोजा टाकणार नाही. आणि त्या अनुषंगाने हि प्रॉपर्टी न्हावे ग्रामपंचायतीची आहे ती त्यांच्याच ताब्यात राहील, माझ्याकडे जे काही आहे ते मी सर्व द्यायला तयार आहे. आयुष्याच्या सुरुवातीला काबाडकष्ट करून जीवन जगलो. त्यामुळे मला पैशाची गरज नाही, भरपूर देवाने दिले आहे तुम्ही लोकं येथे येतात आनंदित होऊन जातात त्यातच आपला समाधान आहे, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अधोरेखित केले.
माजी मंत्री व विद्यमान आमदार रवीशेठ पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले कि, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जे काम केले आहे ते इतिहासात कोरीव असे लिहण्यासारखे आहे. माणूस कितीही मोठा असला तरी मन मोठे असले पाहिजे आणि हे मन मोठे करणारे फक्त एकच या देशात रामशेठ ठाकूर आहेत. त्यांच्यामुळे न्हावेखाडीत रामबागच्या रूपाने कमळ उमलले आणि याचा उपयॊग संपूर्ण परिसराला होत आहे. त्यांचे वडील मचव्यावर काम करायचे. माझा आणि त्यांचा परिचय होता. मुंबईला असताना त्यांच्याशी गप्पागोष्टी व्हायच्या. चांगला स्वभाव, चांगला व्यक्तिमत्व आणि बोलण्यात कुठलेही अपशब्द नाही असे होते. त्याच्या पोटी हे नररत्न जन्मले. या नररत्नाने फक्त या परिसरालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला सुगंध दिला. रामशेठना मी प्रत्यक्ष जेव्हा बघितले तेव्हा खरा माणुसकीने ओतप्रोत व्यक्तिमत्व अधोरेखित झाले. मुंबई दहा मिनिटावर आली आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात रामबागमुळे या विभागाचे नाव मोठे होणार आहे. परमेश्वररूपी माणूस जन्माला आला म्हणून या न्हावाखाडीचे नाव या जगात पसरला असून त्यांनी करोडो रुपयांची वास्तू जनतेला निर्माण करून दिली आहे आणि या वास्तूचा फायदा परिसराला होत आहे. लोकांसाठी काम करण्याचे काळीज लागते आणि ते मोठे काळीज त्यांच्याकडे आहे, सत्कार्यरूपी काम त्यांचे आहे त्यामुळे ते दानशूर व्यक्तिमत्व आहेत, असेही त्यांनी सांगितले.

कोट-
एक राजा होता त्याने वस्तूला हात लावल्यावर सोने व्हायचे पण आपण ते कुणी बघितले नाही. पण एक खाजण होते त्या जमिनीला हात लावल्यावर त्याचे सोने होते हे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रामबागच्या निर्मितीतून दाखवले आहे. आणि हे सर्व त्यांनी लोकांकरिता केले आहे. स्वतः करिता नाही. मुंबईमध्ये सुद्धा असा सुंदर प्रकल्प नाही तो रामशेठ ठाकूर यांनी उभारला आहे. तुम्ही लोकांसाठी आणि हा प्रकल्प लोकांसाठी आहे. जे चांगले आहे त्याला चांगले म्हणण्याची दानत महाराष्ट्राला आहे, त्यामुळे मी रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन करतो कि, त्यांनी पुढच्या पिढीला सुंदर वास्तू आणि मोकळ्या हवेत आणण्याचे काम केले आहे. तुमचे काम चांगले आहे त्यामुळे ते तुम्ही लोकांसाठी करत राहता, म्हणून पवारसाहेब बोलतात आम्हाला कुणाला जमत नाही ते रामशेठना कसे जमते. त्यामुळे कृपा करून टीकाकारांनी चांगल्या गोष्टीत राजकारण आणू नये. – ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे

3 Comments

  1. 68wim February 26, 2026

    Alright, trying out 68wim. Deposited some funds, let’s see if lady luck is on my side tonight! Gonna try the slot machines. Could be a fun night! Have a look at 68wim

  2. win 456 February 26, 2026

    Heard someone mention ‘win 456’. Assuming that’s win456club? Games any good? Big plus if they process withdrawals fast! win 456

  3. f168n.com February 26, 2026

    Heard about f168n.com. is it a scam? Don’t want to spend my money on sites that are rigged: f168n.com

Leave a Reply

Your email address will not be published.