Press "Enter" to skip to content

रविवारी पनवेलमध्ये निर्धार मेळावा !

रविवारी पनवेलमध्ये निर्धार मेळावा

पनवेल (प्रतिनिधी) नैना प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपच्यावतीने रविवार दिनांक २४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ‘निर्धार’ मेळावा होणार आहे.
भारतीय जनता पक्ष हा सातत्याने भूमिपुत्र, शेतकरी, कष्टकरी, प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मात्र महाविकास आघाडीचे स्वार्थी आणि निष्क्रिय नेते व पदाधिकारी हेतुपरस्पर नैना प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये गैरसमज पसरवून भडकविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सर्वसामान्य भूमिपुत्र, शेतकरी, प्रकल्पग्रस्तांच्या समस्या समजून शासनातर्फे त्यावर तोडगा काढण्याकरिता भाजप व आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी कटिबद्ध आहेत. त्या अनुषंगाने हा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published.