खारघर येथे पंचकुंडीय गायत्री महायज्ञाचे आयोजन ! जागृत फाउंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खरपुरिया यांची माहिती !
पनवेल , प्रतिनिधी : खारघर येथे पंचकुंडीय गायत्री महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. १७ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० ते सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास खारघर सेक्टर २० येथील हावरे स्प्लेंडर सोसायटी येथे आयोजित करण्यात आले आहे.
अखिल विश्व गायत्री परिवार शांतिकुंज हरिद्वार यांच्या वतीने २१ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान खारघर, नवी मुंबई येथील कार्पोरेट पार्क मैदानात अश्वमेध महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी गायत्री परिवाराच्या वतीने अनेक सोसायट्यामध्ये गायत्री यज्ञ , दीप यज्ञ केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून खारघर सेक्टर २० येथे गायत्री महायज्ञाचे आयोजन केल्याची माहिती जागृत फाउंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खरपुरिया यांनी दिली.






Be First to Comment