Press "Enter" to skip to content

सक्सेस कोचिंग क्लासेसच्या वतीने तळोजा येथे स्टुडन्ट वेल बीइंग प्रोग्राम !

सक्सेस कोचिंग क्लासेसच्या वतीने
तळोजा येथे स्टुडन्ट वेल बीइंग प्रोग्राम !

पनवेल, प्रतिनिधी : आजची स्पर्धा आणि आव्हाने यामध्ये विद्यार्थ्यांनी कसे टिकावे, मिळालेल्या संधीचा वापर करून आपले करिअर कसे घडवावे, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी तळोजा येथील सक्सेस कोचिंग क्लासेसच्या वतीने तळोजा येथे स्टुडन्ट वेल बीइंग प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. सक्सेस कोचिंग क्लासेसचे संचालक शोएब सुर्वे यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कोकण दर्पणचे संपादक संजय महाडिक, उम्मीद फाउंडेशनचे जनसंपर्क अधिकारी हमीद पटेल , सामाजिक कार्यकर्ते मुबीन सुर्वे, उम्मीद फाउंडेशनचे संस्थापक परवेझ फरीद, पनवेल मनपाचे नगरसेवक हरेश केणी , ऍड किशन चौधरी, सामाजिक कार्यकर्ते सलीम रतनसी आदी मान्यवरांनी विद्यर्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी तयार केलेले विज्ञान प्रकल्पाचे प्रदर्शन करण्यात आले. तर अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी गुणवंत विद्यार्थाना सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत भर टाकण्यासाठी सक्सेस कोचिंगच्या माध्यमातून अनेक उपक्रम भविष्यात राबविणार असल्याचा मनोदय यावेळी सक्सेस कोचिंग क्लासेसचे संचालक शोएब सुर्वे यांनी कोकण दर्पणची बोलताना व्यक्त केला.

कोकण दर्पण ! कोकण live

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published.