पत्रकार कुटुंबीय स्नेह सोहळा !
जेव्हा प्रीतम म्हात्रे पत्रकारांचे कुटुंबप्रमुख बनतात…
खरंतर पत्रकार म्हटलं कि आयुष्यातला सर्वात बिझी माणूस कि काय असे झालं आहे. जणू काही समाजाचे सर्व प्रश्न तोच मांडणार आहे आणि तोच सोडविणार आहे. हे सर्व करत असताना स्वतःचे जीवन जगायचे तो विसरून जातो. कुटुंबासाठी कधी आणि किती वेळ काढेल हे सांगणे कठीण झाल्यासारखे. आणि वेळ काढलाच तर दहा वेळा फोन वाजत असतो. अशा व्यस्त जीवनापासून पत्रकारांनी आपल्या कुटुंबियांसाठी थोडा वेळ काढावा , हि मनस्वी बाळगून सर्व पत्रकारांचे लाडके मित्र असलेले पनवेल महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी खालापूर येथे पत्रकार सह कुटुंबीय स्नेह सोहळ्याचे आयोजन केले. हा स्नेह सोहळा अतिशय कौटुंबिक झाला. नेहमी व्यस्त असलेले पत्रकार बंधू -भगिनी आज आपल्या कुटुंबासोबत रमले , हरवले. कुठे तरी जगण्याची , हसण्याची , कुटुंबात ठरविण्याचा , कुटुंबासाठी काही तास का होईना , पण मनमुराद जगण्याचा योग प्रीतम म्हात्रे यांनी घडवून आणला.
फक्त पनवेल नव्हे तर नवी मुंबई, उरण, अलिबाग , कर्जत, खोपोली, खालापूर , महाड आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यातून पत्रकार आपल्या कुटुंबासोबत जमले होते.
अगदी प्रीतम यांनी देखील एक जिवलग मित्र, पत्रकारांच्या घरातील सदस्य म्ह्णून मनमोकळ्या गप्पा मारल्या. अगदी कुटुंबाचा संघर्ष, जे एम म्हात्रे साहेबांच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासात त्यांच्यातला माणूस पत्रकारांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी प्रीतम म्हात्रे यांच्या तोंडून ऐकलं आणि कुठेतरी सर्वांच्याच डोळ्यांच्या काठा नकळत ओलसर झाल्या.
सर्वात जिव्हाळ्याचे म्हणजे प्रीतम म्हात्रे यांनी पत्रकारांना मैत्रीचा हात दिला. अगदी कधीही चांगल्या आणि वाईक प्रसंग आणि परिस्थितीत साथ देण्याचा विश्वास दिला. त्यासाठी त्यांच्या काही सहकार्याचे मोबाईल नुंबर शेयर केले. जाणून प्रीतम म्हात्रे पत्रकारांचे कुटुंब प्रमुख झाले. यांचा तो सहजपणा सर्वच पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांना आपलेपणाचा वाटला.प्रीतम म्हात्रे यांनी योजलेल्या या आनंद सोहळ्यासाठी आपणास मनपूर्वक धन्यवाद !
प्रा. संजय महाडिक
लेखक – संपादक
कोकण दर्पण मीडिया ग्रुप






Hello,
Music download private server https://0daymusic.org MP3, FLAC, LIVESETS, Music Videos.
Team 0day
Excellent write-up
Outstanding feature