Press "Enter" to skip to content

शहीद खान्देशसुपुत्र योगेश पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ खान्देश विकास फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न !

कोकण दर्पण

शहीद खान्देशसुपुत्र योगेश पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ खान्देश विकास फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न !

पनवेल, प्रतिनिधी : शहीद खान्देशसुपुत्र योगेश पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ खान्देश विकास फाउंडेशनच्या वतीने खारघर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी शहीदमाता सुनीता पाटील , बंधू नरेंद्र पाटील यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी नगरसेविका नेत्रा पाटील ,सामाजिक नेते किरण पाटील , डॉ. राकेश सोमाणी यांनी तसेच उपस्थितांनी आदरांजली शहिदांना वाहिली.

सामाजिक हितासाठी खान्देश विकास फाउंडेशन काम करते, अशी भावना यावेळी शहीद पिता, माजी पोलीस अधिकारी तथा खान्देश विकास फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.