चला समजूया हृदयाला कार्यक्रमात
डॉक्टरांनी दिला आरोग्याचा कानमंत्र !
पनवेल, प्रतिनिधी : खारघर येथील चला समजूया हृदयाला कार्यक्रमात जेष्ठ हृदयरोगतज्ञा डॉ. केशव काळे आणि ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. नितीश अरोरा यांनी खारघरवासियांना आरोग्याचा कानमंत्र दिला. २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन व २६/११ शहीद दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी खारघर शहर आणि कोकण रहिवाशी संघाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पनवेल महापालिकेतील भाजपचे माजी नगरसेवक रामजी गेला बेरा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
जेष्ठ हृदयरोगतज्ञ डॉ. केशव काळे आणि सिनिअर ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. नितीश अरोरा
खारघर सेक्टर ७ येथील सत्याग्रह कॉलेजच्या सभागृहात आयोजित केलेल्या चला समजूया हृदयाला कार्यक्रमात जेष्ठ हृदयरोगतज्ञा डॉ. केशव काळे यांनी हार्ट अटॅकचे प्रमाण का वाढतंय ? त्याची कारणे आणि उपाय यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तर सिनिअर ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. नितीश अरोरा यांनी हाडांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी जेष्ठ विचारवंत, साहित्यिक डॉ. जी. के. डोंगरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नगरसेवक नरेश ठाकूर , नगरसेवक शत्रुघ्न काकडे, प्रज्ञा प्रकोष्ठ रायगड अध्यक्षा, ऍड. गीता चौधरी, भाजप महिला मोर्चा सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक बिना गोगरी, नमो नमोचे संतोष शर्मा, गुरुनाथ गायकर, दिलीप जाधव, जयेश गोगारी ,अनिता जाधव,निर्मला यादव, अश्विनी भुवड, अर्चना घोरपडे, नीलम विसपुते, नवनीत मारू, गहिनीनाथ नावडेकर, रमेश खडकर, भरत कोंढाळकर, संदीप माघाडे, संदीप राठोड, सनी नवघरे, संदीप रेड्डी, शेंलेन्द्र त्रिपाठी, अशोक जांगिड, विलास आलेकर आदी उपस्थित होते
सदर कार्यक्रमाच्या आयोजनात भाजप खारघर शहर सरचिटणीस दिपक शिंदे , भाजप महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार, भाजप खारघर युवामोर्चा अध्यक्ष नितेश पाटील, सरचिटणीस अक्षय लोखंडे यांनी विशेष पुढाकार घेतला.सदर कार्यक्रमासाठी कोकण दर्पण , न्युज लिंक , आदर्श भारत माझा यांनी माध्यम प्रायोजक म्हणून भूमिका निभावली.










Be First to Comment