Press "Enter" to skip to content

हार्ट अटॅकचे प्रमाण का वाढतंय ? खारघर येथे रविवारी मार्गदर्शन शिबीर !

हार्ट अटॅकचे प्रमाण का वाढतंय ?
खारघर येथे रविवारी मार्गदर्शन शिबीर !

पनवेल, प्रतिनिधी : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, खारघर व कोकण रहिवाशी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हृदय विकारावर व्याख्यानाचे आयोजन केले आहे.
तरुणांमध्ये हृदय विकाराचे प्रमाण वाढत आहे ही भीषणता लक्षात घेऊन भाजप खारघर व कोकण रहिवाशी संघ यांच्या वतीने यावर जनजागृती सुरु केली आहे. हृदय विकाराची लक्षणे, काळजी व उपचार यावर जेष्ठ हृदयतज्ञ डॉ. केशव काळे यांचे तर हाडांची झीज लवकर का होत आहे? यावर नामांकित ऑर्थोपेडिक सर्जन डॉ.नितीश अरोरा यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.

26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11. 30 वाजता खारघर सेक्टर 7 येथील सत्याग्रह कॉलेज मध्ये सदर शिबीर होणार आहे.
तरी खारघर, पनवेल व नवी मुंबईतील नागरिकांनी या आरोग्य विषयक व्याख्यानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन भारतीय जनता पार्टी, खारघर मंडलाचे महासचिव दीपक शिंदे यांनी केले आहे.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published.