Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादी काँग्रेसचा २६ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईत भव्य मेळावा ! शरद पवार करणार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन !

कोकण दर्पण ! कोकण Live

राष्ट्रवादी काँग्रेसचा २६ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईत भव्य मेळावा !
शरद पवार करणार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन !

नवी मुंबई , प्रतिनिधी :

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा भव्य कार्यकर्ता मेळावा नवी मुंबईत आयोजित करण्यात आला असून नेरुळ सेक्टर २६ येथील बामनदेव मैदानात २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर कार्यकर्ता मेळाव्याला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नेरुळ येथे आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई अध्यक्ष चंद्रकांत पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई महिला अध्यक्षा सलुजा सुतार , राष्ट्रवादीचे नवी मुंबई नेते संदीप सुतार तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते पत्रकार परिषदेला उपस्थित होते. सदर मेळाव्यात कर्तृत्वान महिलांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दृष्टीने नवी मुंबईतील सदर महत्वपूर्ण असणार आहे. शरद पवार कार्यकर्त्यांना नेमकं काय मार्गदर्शन करतील, नवी मुंबीयाबाबत नेमकी काय भूमिका मांडतील
याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published.