Press "Enter" to skip to content

पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रामजीभाई गेला बेरा यांची प्राणज्योत मालवली !

पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रामजीभाई गेला बेरा यांची प्राणज्योत मालवली.

पनवेल, प्रतिनिधी : पनवेल महानगरपालिका प्रभाग ५ चे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक रामजी भाई बेरा (वय-५३) यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने अपोलो हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
आठ महिन्यांपूर्वी त्यांना हृदय विकाराचा झटका आला होता, त्यावेळी यशस्वी अंजियोप्लास्टि झाली होती.मात्र तीन दिवसापूर्वी त्यांना अस्वस्थपणा जाणवत होता. दुर्दैवाने उपचारा दरम्यान रक्तदाब कमी झाल्याने त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी, २ मुलगे, १ मुलगी व ५ भावंडे असा मोठा परिवार आहे.
मितभाषी, दांडगा जनसंपर्क असणारे रामजी भाई एक यशस्वी उद्योजक म्हणून प्रसिद्ध होते. समाजातील एक दानशूर व्यक्ती म्हणून त्यांचे नावलौकिक होते. खारघर शहरातील पहिले अमराठी नगरसेवक म्हणून त्यांची ओळख होती.
रामजी भाई यांच्या निधनामुळे खारघर शहरात शोक व्यक्त करण्यात येत असून राजकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!
भावपूर्ण श्रद्धांजली..
उद्या दुपारी ३ वाजता खारघर वैकुंठ धाम स्मशानभूमी, सेक्टर १४, खारघर येथे अंतिम संस्कार होणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published.