दि बा पाटील ऊर्जास्थान चळवळ स्पर्धेतील स्पर्धकांचा वाशीत दसऱ्यादिनी होणार गुणगौरव !
स्पर्धेच्या उस्फुर्त प्रतिसादामुळे दुसरे चरण २० डिसेंबर पर्यंत वाढविण्याचा निर्णय – दशरथ भगत !
नवी मुंबई, ( शैलेश घाग ) :- नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचा ५वा वर्धापन दिन मंगळवार २४ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ४ वाजता सिडको एक्सिबिशन सेंटर ऑडिटोरियम, सेक्टर -३० वाशी रेल्वे स्टेशन जवळ, नवी मुंबई होणार असून त्या पार्श्वभूमीवर लोकनेते दि.बा.पाटील स्फूर्तीस्थान अंतर्गत विविध १० प्रकारांत घेतलेल्या चळवळ स्पर्धेच्या माधमातून दिबांचे कार्य साहित्य व कला स्वरुपात सादर केलेल्या गुणवंतांचा गुणगौरवपर सन्मान सोहळा माजी मंत्री -आमदार गणेशजी नाईक, माजी खासदार – रामशेठ ठाकूर, दि. बा. पाटील नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष – दशरथदादा पाटील, दि बां चे सुपुत्र – अतुलजी पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर केंद्र केंद्र राज्याच्या विविध सरकारी योजनांचा लाभ थेट नवी मुंबईतील नागरिक लाभार्थ्यांना मिळावा यासाठी दिवंगत करसन भगत शासकीय योजना केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचा मानस असल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत यांनी वाशीतील जाहीर पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत यांनी सांगितले की, दि. बा. पाटील ऊर्जास्थान स्पर्धेत १२ हजारांहुन अधिकारी संख्येने सर्वसामान्य नागरिक तसेच शाळा व महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यानी सहभाग घेतला आहे व अद्यापही स्पर्धाकांचे अर्ज येतो असल्याने त्यांस प्रोत्साहन आणि आशीर्वाद देऊन अधिक स्पर्धकांनी सहभाग घेण्याचे आवाहन पुन्हा करण्यात आले आहे. दि. बा. पाटील चळवळ स्पर्धेला मिळत असलेला वाढता उस्फुर्त प्रतिसाद लक्षात घेता यातील चित्रकला, लेख, स्फूर्तिगीत लेखन, ऑडिओ, व्हिडीओ, दि. बा. पाटील साहेबांचे दुर्मिळ फोटो (अल्बम), वृत्तपत्र कात्रणे (न्यूज पेपर कटींग) ,चित्रीकरण ( व्हिडीओ शूटिंग) दि .बा .पाटील साहेबांचे हस्तलिखित पत्र, दि बां च्या आंदोलन व संघर्षांवर माहितीपट स्पर्धा, शॉर्ट फिल्म आदी साहित्य व कला स्वीकारण्याची अंतिम तारीख वाढवून ती 20 डिसेंबर 2023 पर्यंत करण्यात आली असल्याचे दशरथ भगत यांनी बोलताना स्पष्ट केले.
नवी मुंबईतील शहरी भाग गावे या मूळ जन -जाती भूमिपुत्रांसह, शहरातील व झोपडपट्टी भागातील विविध बाधित घटकांचा आवाज सरकार दरबारी पोहचवण्यासाठी व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे. नवी मुंबई सामाजिक पुनर्वसन संस्थेने सामाजिक बांधिलकीतून केलेली विकासकामे, नवी मुंबईतील जनतेच्या न्याय हक्कासाठी केलेली आंदोलन, मोर्चे आदी कार्याचे सादरीकरण. वाशीतील संस्थेच्या वर्धापन दिनी करण्यात येणार आहे. नवी मुंबईतील विविध सामाजिक संस्थांना उचित मदत करणे , स्वच्छ भारत अभियानात शून्य कचरा योजना यंत्रणा बाबत संस्था प्रयत्न करणार आहे, त्यात प्रामुख्याने स्वच्छ भारत अभियानात कार्यरत असणारे सफाई कर्मचारी व कचरा वेचक घटक आदींचा देखील विशेष सन्मान दसऱ्या दिनी वर्धापन दिन व गुणगौरव सोहळ्यात करण्यात येणार आहे.
लोकनेते दि.बा.पाटील ऊर्जास्थान या स्पर्धेतील स्पर्धकांना स्पर्धेबाबत सखोल आणि परिपूर्ण माहिती सहज प्राप्तीसाठी २४ ऑक्टोबर रोजीच्या सोहळ्यात www.dashrathbhagat.com वेबसाईटचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे देखील दशरथ भगत यांनी सांगितले.
यावेळी पत्रकार परिषदेत दि. बा. पाटील चळवळ स्पर्धेच्या संयोजन समितीतील रविंद्र वाडकर, प्रशांत निगडे, किशोर पाटील, प्रवक्ते शैलेश घाग, डॉ. विवेक भोईर, सुधाकर लाड, गजानन म्हात्रे, रामनाथ म्हात्रे, नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे पदाधिकारी संजय यादव, देवेंद्र खाडे, वैजयंती भगत, वंदना घरत, हेमंत देसाई हे उपस्थित होते.






Be First to Comment