जेष्ठ हृदयरोगतज्ञ डॉ. संजय तारळेकर घेणार कर्जतकरांच्या हृदयाची काळजी !
-कर्जत येथील रायगड हॉस्पिटलमध्ये कॅथलॅब वैद्यकीय सुरु !
- रायगड हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. नंदकुमार तासगावकर यांच्या शुभहस्ते कॅथ लॅबचे उदघाट्न संपन्न !
कर्जत, प्रतिनिधी : जेष्ठ हृदयरोगतज्ञ तथा नवी मुंबई, पनवेल येथील शुश्रुषा हार्टकेअर हॉस्पिटल ग्रुपचे संस्थापक डॉ. संजय तारळेकर आता कर्जत, खालापूर, खोपोली आणि रायगड जिल्ह्य परिसरातील नागरिकांच्या हृदयाची काळजी घेणार आहेत. शुश्रुषा हार्ट केयर हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने कर्जत येथील रायगड हॉस्पिटल आता हृदयाची काळजी घेण्यासाठी सज्ज झाले आहे.
कर्जत येथील रायगड हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये हृदयरोगतज्ञ डॉ. संजय तारळेकर यांच्या कॅथलॅबचे उदघाट्न रायगड हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेजचे संस्थापक डॉ. नंदकुमार तासगावकर यांच्या शुभहस्ते कॅथलॅबचे उदघाट्न संपन्न झाले.
यावेळी रायगड हॉस्पिटलच्या संचालिका वंदना तासगावकर, मृदल तासगावकर, रायगड मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. विनायक सबनीस, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हुबू जाधव, डॉ. सागर सोळंकी, डॉ. रुतुजा पाटील, शुश्रुषा हार्ट केयरच्या प्रशासकीय अधिकारी अश्विनी कुलकर्णी तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थिती होते.
कर्जत येथील रायगड हॉस्पिटलमध्ये सुरु झालेल्या कॅथलॅबमध्ये अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी तसेच हृदयाबाबत इतर वैद्यकीय सेवा मिळणार आहेत. हृदयविकरावर पुढील सर्व अत्याधुनिक उपचार डॉ. संजय तारळेकर यांच्या पनवेल आणि नेरुळ नवी मुंबई येथील शुश्रुषा हर्टकेयर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. कर्जत येथे सुरु झालेल्या कॅथलॅबमध्ये डॉ. संजय तारळेकर यांची शुश्रुषा हार्टकेयर टीम कॅथलॅब वैद्यकीय सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे कर्जत, खालापूर, खोपोली तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. येथे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत मोफत आरोग्य सेवा उपलब्ध आहे.
जेष्ठ हृदयरोगतज्ञ डॉ. संजय तारळेकर आणि डॉ. अनिता तारळेकर यांच्या शुश्रुषा हार्टकेअर हॉस्पिटलची ही वैद्यकीय क्षेत्रातील सेवेची उतुंग भरारी आहे. 2002 साली डॉ. संजय तारळेकर आणि डॉ. अनिता तारळेकर नेरुळ नवी मुंबई येथे शुश्रुषा हार्टकेयर अँड स्पेशालिटी हॉस्पिटलची सुरुवात केली. अनेकविध अत्याधुनिक यंत्र सामुग्रीने शुश्रुषा हास्पिटल सुरु केले. हृदयरोग आणि इतर सर्व रोगांवर उपचार करणारे शुश्रुषा हॉस्पिटल नवी मुंबईकरांची लाईफलाईन झाली. आरोग्य तपासणी,ईसीजी, रक्त तपासणी, एक्सरे, टू डी इको, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, हृदयशस्त्रक्रिया तसेच इतर अनेक वैद्यकीया सेवा उपलब्ध आहेत. समाजातील अल्प उत्पन्न गटासाठी, आर्थिक दुर्बल घटकासाठी शासनाच्या आरोग्य योजना अंतर्गत वैद्यकीया सेवा येथे उपलब्ध आहेत.
नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात पहिली हृदयशस्त्रक्रिया करण्याचा मान डॉ. संजय तारळेकर यांच्या शुश्रुषा हॉस्पिटलला मिळाला. वैद्यकीय क्षेत्रात उतुंग भरारी घेताना पनवेल येथे शुश्रुषा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची स्थापना केली. पनवेल, उरण आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी शुश्रुषा हॉस्पिटल मोठी उपलब्धी आहे. वडखळ येथील जे एस डब्ल्यू कंपनीच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये देखील डॉ. संजय तारळेकर यांच्या शुश्रुषा हार्टकेयर हॉस्पिटलच्या वतीने कॅथलॅब सेवा सुरु करण्यात आली आहे.
आता रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, खोपोली, नेरळ आणि परिसरातील नागरिकांच्या हृदयाची काळजी घेण्यासाठी डॉ. संजय तारळेकर यांचे शुश्रुषा हार्ट केयर आता सज्ज झाले आहे. कर्जत येथील रायगड हॉस्पिटलमध्ये कॅथलॅब सेवा सुरु करण्यात आली आहे. हृदयरोग उपचाराबाबतच्या अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी सुविधा येथे उपलब्ध आहे. त्यामुळे डॉ. संजय तारळेकर यांचे शुश्रुषा हार्टकेअर आता कर्जत, खालापूर, खोपोलीकरांची देखील लाईफलाईन बनेल याबाबत विश्वास वाटतो.
कोकण दर्पण









Be First to Comment