Press "Enter" to skip to content

रॉक स्टार्स संघाने जिंकला अग्रवंश चषक २०२३ ! अग्रवंश प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा खारघर येथे संपन्न !

रॉक स्टार्स संघाने जिंकला अग्रवंश चषक २०२३ !
अग्रवंश प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा खारघर येथे संपन्न

पनवेल, प्रतिनिधी : नवी मुंबई, पनवेल येथील अग्रवंश समाजाच्या वतीने खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या अग्रवंश प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेतील अग्रवंश चषक २०२३ रॉक स्टार्स संघाने जिंकला. जे एस बी बोईज संघ उप-विजेता ठरला तर द मॅव्हेरिसिक्स संघाने तिसऱ्या क्रमांकाचे पारोतोषिक पटकावले. तर मॅन ऑफ दि सिरीज राहुल वैश्य याने पटकावली.

अग्रहरी समाजातील तरुणांना खेळातून प्रोत्साहन देण्यासाठी , समाजातील तरुणांना एकसंघ करण्याच्या उद्देशाने अग्रवंश प्रीमियर लीग अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे खारघर येथे आयोजन करण्यात आले होते. खारघर येथे संपन्न झालेल्या सदर क्रिकेट स्पर्धेमध्ये १० संघांनी सहभाग घेतला. सदर क्रिकेट स्पर्धा आयोजनात आणि यशस्वी करण्यासाठी राजेश गुप्ता , मोहित अग्रवाल , संजय जिंदाल, राकेश गुप्ता, रणजित वैश्य, अजय अग्रहरी, प्रदीप गुप्ता , वैभव अग्रवाल आदींनी विशेष मेहनत घेतली. अग्रहरी समाजाचे तथा सक्षम प्रॉपर्टीजचे राजेश गुप्ता यांनी सदर कार्यक्रम आयोजनात विशेष योगदान दिले. तर जय जिंदाल आणि वैभव अग्रवाल यांनी स्पर्धेसाठी विशेष सहयोग दिला, अशी माहिती अग्रहरी समाजाचे सदस्य तथा आयोजक मोहित अग्रवाल यांनी कोकण दर्पणला दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published.