पनवेल येथील आरोग्य तपासणी महाशिबिरात हृदयरोग तज्ज्ञ
डॉ. संजय तारळेकर यांच्या शुश्रूषा हार्ट केअरचे विशेष योगदान !
पनवेल, प्रतिनिधी : पनवेल खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात सालाबादप्रमाणे आयोजित करणाऱ्या आलेल्या आरोग्य तपासणी महाशिबिरात जेष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. संजय तारळेकर यांच्या नेरुळ- नवी मुंबई येथील शुश्रूषा हार्ट केअर सेंटर आणि पनवेल येथील शुश्रूषा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने विशेष योगदान दिले. पाणेवळ येथील सदर शिबिरात वैद्यकीय सेवा पुरविण्याची परंपरा शुश्रूषा हॉस्पिटलने कायम ठेवली आहे.
विशेष म्हणजे रविवारी संपन्न झालेल्या सदर महाशिबिरादरम्यान माजी मंत्री तथा आमदार गणेश नाईक, लोकनेते तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुश्रूषा हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाची भेट घेत देत शुश्रूषा हॉस्पिटलच्या वैद्यकीय सेवा कार्याबद्दल कौतूक केले व शुभेच्या दिल्या.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल, भारतीय जनता पार्टी पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा पंधरवडा निमित्ताने खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात विनामूल्य आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार वाटप महाशिबीर यशस्वीपणे पार पडले. या १५ व्या या महाशिबिराचे उदघाटन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
या महाशिबिरात शुश्रूषा हॉस्पिटलच्या वतीने दोन वैद्यकीय पथके सहभागी झाली होती. डॉ. शैलेश फाटक, डॉ. क्षीरसागर, डॉ. ऋतुजा पाटील , रत्नमाला पाब्रेकर यांच्यासमवेत १५ वैद्यकीय कर्मचारी वैद्यकीय सेवेसाठी उपस्थित होते. यावेळी शेकडो रुग्णांना वैद्यकीय सल्ला तसेच वैद्यकीय तपासणी कारणात आली. १५० हुन अधिक मोफत ईसीजी काढून योग्य तो वैद्यकीय सल्ला डॉक्टरांनी दिला.
तसेच सर्वसाधारण रोग, बालरोग, महिलांचे आजार, त्वचारोग, हृदयरोग, दंतरोग, हाडांचे रोग, ईसीजी, मधुमेह, नाक-कान-घसा, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, क्षयरोग, कॅन्सर अशा विविध प्रकारच्या तसेच सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या तज्ज्ञांमार्फत करून सल्ला आणि औषधोपचार मोफत करण्यात आले. त्याचबरोबर डोळ्यांची तपासणी व चष्मे वाटप, तसेच अपंगांना तीन चाकी सायकल वाटप, कर्णबधिरांना श्रवणयंत्र वाटप करण्यात आले. यावेळी आयुष्यमान भारत डिजिटल कार्ड, तसेच दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. त्याचबरोबरीने अवयवदानाचे फॉर्म भरण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली होती. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या महाशिबिराचा ११ हजार ३५२ नागरिकांनी लाभ घेतला.
Be First to Comment