रायगड जिल्हा परिषद शाळांची प्रचंड दुरावस्था ! आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली ZP शाळांची पाहणी ! विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही : आमदार प्रशांत ठाकूर यांचा विद्यार्थी-पालकांना दिलासा !
पनवेल, प्रतिनिधी : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या रायगड जिल्हा परिषद शाळांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. पडक्या इमारती, ना वीज, ना पाणी, ना धड स्वच्छतागृह अशा भयंकर परिस्थितीत ZP शाळेतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
दरम्यान, या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर मधील फरशीपाडा, पापडीचा पाडा, ओवे कॅम्प शाळांना भेट देऊन तिथल्या अडचणी समजून घेतल्या.
खारघर – फरशीपाडा शाळेला ना लाईट, ना पाणी आहे. पत्र्याच्या
पडक्या इमारतीत विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिकतायत. चिखल, सापाची भीती, घाणीत बसून अंधारात विद्यार्थ्यांना शिकावे लागत आहे. याबाबत होपमिरर फाउंडेशचे अध्यक्ष रमझान शेख यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन या प्रश्नाकडे सोडविण्याबाबत निवेदन केले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी विषयाचे गांभीर्य पाहून शनिवारी सकाळी फरशीपाडा शाळेला भेट दिली.
ZP शाळांमधील प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने बैठक लावू, विद्यार्थ्यांचे कदापि नुकसान होऊ देणार नाही, असा विश्वास स्थानिक रहिवाशी, विद्यार्थी व पालकांना यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला.
यावेळी होपमिररचे अध्यक्ष रमझान शेख, नगरसेवक हरेश केणी,नगरसेवक पापा पटेल, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल,युवानेते विनोद घरत, भाजपनेते प्रभाकर जोशी उपस्थित होते. दरम्यान, सदर प्रश्नाची तातडीने दखल घेतल्याने
होपमिररचे रमझान शेख यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे विशेष आभार मानले.






Be First to Comment