Press "Enter" to skip to content

डॉ. नितीन शेळके यांच्या करंजाडे येथील शेळके’ज स्पेशालिटी क्लिनिकचे उदघाट्न संपन्न !

डॉ. नितीन शेळके यांच्या शेळके’ज स्पेशालिटी क्लिनिकचे उदघाट्न संपन्न !

पनवेल, प्रतिनिधी : मधुमेह व हृदयरोग तज्ञ डॉ. नितीन शेळके यांच्या पनवेल जवळील करंजाडे येथील शेळकेज स्पेशालिटी क्लिनिकचे उदघाट्न करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार आणि उपसरपंच सागर आंग्रे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी भाजपाचे करंजाडे विभागीय अध्यक्ष कर्ण शेलार तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शेळके’ज स्पेशालिटी क्लिनिकचे उदघाट्न संपन्न झाले.
मधुमेह व हृदयरोग तज्ञ डॉ. नितीन शेळके हे शेळके’ज क्लिनिकचे वैद्यकीय संचालक आहेत. शेजके’ज स्पेशालिटी क्लिनिक करंजाडेकरांच्या आरोग्यसेवेसाठी सज्ज झाले आहे.
करंजाडेकरांच्या वैद्यकीय सेवेसाठी शेळके’ज स्पेशालिटी क्लिनिक मोठी उपलब्धी ठरणार आहे.

बालरोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ञ, मनोरोगतज्ज्ञ डॉक्टरांची वैद्यकीय सेवा !
फिजिशियन, डायटिंशियन, सर्जन डॉक्टरांची वैद्यकीय सेवा शेळकेज क्लिनिकमध्ये उपलब्ध असणार आहे.

दरम्यान, डॉ. नितीन शेळके यांच्या शेळकेज स्पेशालिटी क्लिनिकला मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
करंजाडेकरांच्या आरोग्याची काळजी घेऊ, अशी भावना यावेळी शेळकेज स्पेशालिटी क्लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ. नितीन शेळके यांनी यावेळी व्यक्त केली.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published.