पारनेरकर रहिवाशी संघ आयोजित कामोठ्यातील सार्वजनिक दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा !
पनवेल, प्रतिनिधी : पनवेल महानगरातील कामोठे शहरात पारनेरकर रहिवाशी संघाच्या माध्यमातून यंदाचा सार्वजनिक दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर तसेच समाजातील सर्व स्तरातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून पारनेकर कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आणि दहीहंडी उत्सवाचे कौतुक केले.
अराजकीय असलेल्या दहीहंडी उत्सवाला कामोठे सह पनवेल व नवी मुंबईकरांनी प्रचंड प्रतिसाद दिली. नागरिकांच्या अलोट गर्दीत अनेक गोविंदा पथकांनी सलामी दिली. यनिमित्त आयोजित महिलांच्या पैठणी कार्यक्रमाला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला,
कामोठ्यातील ही दहीहंडी म्हणजे पारनेरकर कुटूंबलंबायांच्या एकजुटीचे हे दर्शन आहे. पारनेकर रहिवाशी संघाच्या वतीने पहिल्यांदाच मात्र, भव्य अशा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कामोठे शहरात सुमारे 3 हजार पारनेकर कुटुंबीय वास्तव्य करतात. पनवेल महापालिका क्षेत्रात तसे पाहता पारनेकर कुटुंबियांची संख्या 10 हजाराच्या घरात जाईल. मात्र, उत्सवाच्या माध्यमातून पारनेकर कुटुंबिय एकत्र आले आहेत.
कामोठे सेक्टर 36 येथील मैदानात संपन्न झालेल्या दहीहंडी उत्सवाची सुरुवात दहीहंडी पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीने झाली. दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महिलांसाठी खास होम मिनिस्टर या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाग्यशली विजेत्यांना पैठणी भेट देण्यात आली.
सर्व कामोठेकर आणि पनवेल तसेच नवी मुंबईकरांनी पारनेकर दहीहंडी उत्सवाला आवर्जून उपस्थित राहिले.
पारनेरकर आयोजित दहीहंडी उत्सव यशस्वी करण्यासाठी भाऊ फावडे, कुंडलिक वाफारे, राहुल आग्रे, कृष्णा ढोमे, निलेश आहेर, दिलीप घुले, सचिन वाफारे, बन्सी पागिरे, प्रशांत ठुबे, समोर नवले, विठ्ठल गलांडे, शुभम वाफारे, वैभव शेळके, नितीन कवडे, महेश कवडे, अक्षय मगर यांच्यासह सर्व कामोठेस्थित पारनेरकरांनी विशेष मेहनत घेतली. आगामी काळात दहीहंडी उत्सव आणखी मोठया प्रमाणात साजरा करणार, अशी भावना यावेळी पारनेरकर पुत्र राहुल आग्रे यांनी व्यक्त केली.
कोकण दर्पण
Be First to Comment