पारनेरकर’ आयोजित कामोठे येथील दहिहंडी उत्सवाची जय्यत तयारी !
पनवेल, नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे : राहुल आग्रे यांचे आवाहन !
पनवेल, प्रतिनिधी : पनवेल महानगरातील कामोठे शहरात पारनेकर कुटुंबीय एकवटले आहेत. यंदाचा दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्याची जय्यत तयारी पारनेकरांनी केली आहे. पारनेकर रहिवाशी संघाच्या माध्यमातून कोणताही राजकीय रंग न देता कामोठे येथे भव्य-दिव्य अशा दहीहंडी उत्सवाचे आयोजन कारण्यात आल्याची माहिती पारनेकर सुपुत्र तथा एमपॉवर आणि कामोठे कॉलनी फोरमचे समन्वयक राहुल आग्रे यांनी कोकण दर्पणला दिली.
पारनेकर रहिवाशी संघाच्या वतीने पहिल्यांदाच मात्र, भव्य अशा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कामोठे शहरात सुमारे 3 हजार पारनेकर कुटुंबीय वास्तव्य करतात. पनवेल महापालिका क्षेत्रात तसे पाहता पारनेकर कुटुंबियांची संख्या 10 हजाराच्या घरात जाईल. मात्र, उत्सवाच्या माध्यमातून पारनेकर कुटुंबियांना एकत्र आणण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न असल्याची भावना राहुल आग्रे यांनी यावेळी व्यक्त केली.
7 सप्टेंबर रोजी कामोठे सेक्टर 36 येथील मैदानात संपन्न होणाऱ्या दहीहंडी उत्सवाची सुरुवात सकाळी 9 वाजता दहीहंडी पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीने होणार आहे. दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महिलांसाठी खास होम मिनिस्टर या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पहिल्या 10 भाग्यशली विजेत्यांना पैठणी भेट देण्यात येणार आहे.
सर्व कामोठेकर आणि पनवेल तसेच नवी मुंबईकरांनी पारनेकर दहीहंडी उत्सवाला आवर्जून उपस्थिती रहावे, असे आवाहन देखील पारनेकर सुपुत्र राहुल आग्रे यांनी केले आहे.
कोकण दर्पण
Be First to Comment