उलवे शहरातील अनेक नागरिकांनी घेतला प्राणिक हीलिंग शिबिराचा लाभ !
पनवेल, प्रतिनिधी : योगा विद्या प्राणिक अंतर्गत स्पिरिचवल ग्रुपच्या पुढाकाराने उलवे येथे आयोजित केलेल्या मोफत प्राणिक हिलींग आरोग्य शिबिराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. उलवे शहरात प्राणिक हिलींगच्या माध्यमातून भविष्यात अनेक शिबीरे आयोजित करून नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणार असल्याची प्रतिक्रिया प्राणिक उपचारक व प्रशिक्षक मनिषा वाडेकर यांनी यावेळी व्यक्त केली.
सदर प्राणिक हीलिंग शिबीर यशस्वी करण्यासाठी संजना देवधर, धन्वंती दाते, तुलसी नाडकर्णी, मीनाक्षी वालावलकर, रिटा मुजुमदार, माधवी पंडित, निलेश मेळेकर, प्रीतम मडवी, दीपा मौर्या, रमेश मौर्या, माधुरी मुळे, मीरा हिंगोलीकर, नितीन हिंगोलीकर, कुश केसरी, हिरल केसरी मानसी मोरे, डॉ चारूलता बडोळे, प्रदीप निमकर, मीनाली सावंत, मिताली वाडेकर, सुमेधा देवधर, निकिता जेढे, अनघा करमरकर, मेहक पिढाडिया, नंदिनी मुनी, विशाखा दाते, रश्मी पात्रे, प्रबोध शेटे, सुप्रिया हरदास, दत्ता कोरे, श्री व्यंकट आदींनी विशेष मेहनत घेतली.
Be First to Comment