कामोठे येथे मोफत बाल आरोग्य व दंत तपासणी शिबीराचे आयोजन !
पनवेल, प्रतिनिधी : शतायु क्लिनिकच्या वतीने कामोठे येथे मोफत बाल आरोग्य व दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कामोठे सेक्टर 10 येथील आदित्य हाईट्स, शॉप नंबर 8 मध्ये होणाऱ्या शिबिरात शून्य ते 12 वयोगटातील मुलांसाठी आहे.
या शिबिरात नवजात शिशु व बालरोग तज्ञ डॉ. मनोहर काकडे, फॅमिली फिजिशियन व सर्जन डॉ. श्वेता वाघमोडे -काकडे, दंतरोग तज्ञ डॉ. ललितकुमार धायगुडे, दंतरोग तज्ञ डॉ. रुक्मिणी अर्जुन आदी डॉक्टरांचे पथक या शिबिरात मुलांची आरोग्य तपासणी व आरोग्य सल्ला देणार आहेत.
सदर शिबिरात मोफतपणे सहभाग घेण्यासाठी 8097179401 या भ्रमणध्वनीवर आपल्या पाल्याच्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहन डॉ. मनोहर काकडे यांनी केले आहे.
Be First to Comment