कामोठे येथे इन्स्पिरेशन चषक स्पर्धा संपन्न ! 12 संघांचा सहभाग !
पनवेल, प्रतिनिधी : कामोठे येथे इन्स्पिरेशन चषक 2023 क्रिकेट स्पर्धा जल्लोषात संपन्न झाली.
रायझिंग स्टार कामोठे राज पांडे यांच्या पुढाकाराने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कामोठे कॉलनी फोरमचे समन्वयक तथा सखा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सखाराम गारळे यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उदघाट्न संपन्न झाले ल.
कामोठे येथील इन्स्पिरेशन चषक क्रिकेट स्पर्धेत 12 संघांनी सहभाग घेतला. यामध्ये श्रेयश 11 संघाने इन्स्पिरेशन चषक 2023 जिंकला.
मोर्या 11 संघाला दुसरे पारितोषिक तर मास्टर सूर्या 11 तिसऱ्या क्रमांकावर पोहचला.
यावेळी डॉ. सखाराम गारळे
समन्वयक-कामोठे कॉलनी फोरम
संस्थापक- सखा फाऊंडेशन, तसेच राज पांडे इन्स्पिरेशन क्लासेस व स्वराज थरवळ कलर्स ॲाप्टिशियन्स यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
यावेळी राहुलदादा आग्रे, राहुल माने, सुरज नरुटे, तुषार दळवी, सचिन खरात आदी मान्यवर उपस्थित होते.
Be First to Comment