पिल्लई महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न
पनवेल, प्रतिनिधी : महात्मा एज्युकेशन सोसायटीचे पिल्लई कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स पनवेल येथे बुधवार दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ०९:०० ते दुपारी ०४:०० या वेळेत एन. एस. एस. विभागातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
एक रक्ताची बाटली ३ जणांचे प्राण वाचवू शकते. या अजेंड्यासह, सर्व एनएसएस स्वयंसेवक आणि शिक्षकांनी रक्तदानाच्या उदात्त हेतूसाठी सर्व वर्गांमध्ये जनजागृती केली. महाविद्यालयाच्या विविध भागात पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले आणि ऑनलाइन शेअरही करण्यात आले. कार्यक्रमासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
सदर शिबिरात एकूण 449 रक्तपिशव्या जमा झाल्या. या शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला. रक्त पिशव्यांचे संकलन महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदे अंतर्गत नायर हॉस्पिटल, टाटा (ACTRE) हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल, सेंट.जॉर्ज हॉस्पिटल चे डॉक्टर्स आणि त्यांच्या सहकार्यांनी केले. यावेळी लायन्स क्लब ऑफ मिलेनियमचे जिल्हा अध्यक्ष लायन मनमोहन मेहता आणि लायन्स क्लब ऑफ मिलेनियमचे पास अध्यक्ष महेंद्र आर्य उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. शबाब रिझवी आणि प्रा. प्राजक्ता काणे, सर्व एन. एन. एस विद्यार्थी यांनी विशेष मेहनत घेतली. पिल्लई कॉलेज चे मुख्याध्यापक डॉ. गजानन वडेर सर आणि उपमुख्याध्यापिका दीपिका शर्मा मॅडम यांनी शिबिर आयोजनासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.
Be First to Comment