Press "Enter" to skip to content

पारनेकर रहिवाशी संघ आयोजित दहिहंडी उत्सवाची जय्यत तयारी ! राहुल आग्रे यांचा वाढदिवस साजरा करून शुभारंभ !

पारनेकर रहिवाशी संघ आयोजित दहिहंडी उत्सवाची जय्यत तयारी

पनवेल, प्रतिनिधी : कामोठे येथे शुक्रवारी झालेल्या बैठकित “पारनेरकर रहिवासी संघ” ह्यांच्यातर्फे येणाऱ्या ७ सप्टेंबर रोजी, गोपालकाला व दहीहंडी उत्सव सेक्टर-३४ मधील संत तुकाराम महाराज मंदिर शेजारच्या मैदानात साजरा करण्याच्य एकमताने सहमत झाले.

कामोठेमध्ये पार पडलेल्य आजच्या बैठकिला ५०० पेक्षा अधिक पारनेरकर महिला आणि पुरुष मंडळिंनी हजेरी लावली.

राहुल आग्रे यांचा वाढदिवस साजरा!

बैठकिनंतरच उपस्थितांनी आपले पारनेरकर आणि या दहिहंडी उत्सवाचे कार्याध्यक्ष राहुलदादा पांडुरंग आग्रे ह्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करून पारनेरकर रहिवाशी संघाच्या कार्याची सुरवात केली.

याप्रसंगी राहुलदादा पांडुरंग आग्रे यांनी पारनेरकर रहिवाशी संघ दहीहंडी उत्सव-२०२३ साठी नाना आग्रे प्रतिष्ठान तर्फे दहिहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या सर्वांना मोफत पाण्याची घोषणा केली.

श्री. राहुलदाद आग्रे ह्यांचे वडील श्री पांडुरंग ( नाना ) आग्रे ह्याच्यनंतर श्री. राहुलददा आग्रे हेसुद्धा त्याच तत्परतेने आणि आत्मियतेने समाजसेवा करताना दिसत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published.