- दि बा पाटील चळवळ स्पर्धा !
- जासई येथील रयत शिक्षण संस्थेच्या संकुलात दिली स्पर्धेची माहिती !
उरण, प्रतिनिधी : क्रांतिपुत्र तथा लोकनेते दि बा पाटील यांचे कार्य विविध स्पर्धाच्या माध्यमातून सर्व समाजाला कळावे, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या दि बा पाटील : एक चळवळ ! या स्पर्धेबाबत माहिती देण्यासाठी स्पर्धेचे आयोजक असलेल्या नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेने मंगळवारी थेट लोकनेते दिबांचे मूळ गाव जासई गाठले.
लोकनेते दिबांची जन्मभूमी असलेल्या जासई येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज हायस्कुल अँड लोकनेते दिबा पाटील ज्युनिअर कॉलेजला भेट दिली. जासई येथील रयत शिक्षण संस्थेच्या संकुलात पोहचताच दिबा पाटील स्पर्धेतील सर्व चळवळीनी लोकनेते दिबांच्या स्मारकाला भेट देत नतमस्तक झाले. यावेळी दिबा चळवळ स्पर्धेचे सर्वेसर्वा आणि नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा विरोधीपक्षनेते, रयत शिक्षण संस्थेचे सदस्य दशरथ भगत यांनी दिबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पमालिका अर्पण करून वंदन केले.
यावेळी दिबा चळवळ स्पर्धेतील संयोजन समितीतील सदस्य तथा सुप्रसिद्ध जेष्ठ रंगकार्मी रवींद्र वाडकर, नाटककर प्रशांत निगडे, लेखक तथा जेष्ठ पत्रकार सुधाकर लाड, आगरी कोळी संस्कृतीचे अभ्यासक गज आनन म्हात्रे, जेष्ठ पत्रकार अनिलकुमार उबाळे, पत्रकार सुरेश पाटील, पत्रकार कौस्तुभ कटेकर, दिबा चळवळ स्पर्धेचे प्रवक्ते शैलेश घाग, कोकण दर्पणचे संपादक संजय महाडिक, रघुनाथ ठाकूर, जासई ग्रामस्थ विनोद म्हात्रे, गोपीनाथ म्हात्रे, अमोल पाटील, अरुणा घरत, योगिता म्हात्रे, सुमन म्हात्रे, पुष्पा म्हात्रे, वंदना घरत आदी उपस्थिती होते.
यावेळी प्राचार्य अरुण घाग यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी दिबा चळवळ स्पर्धेचे प्रवक्ते शैलेश घाग यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना स्पर्धेची सविस्तर माहिती दिली.
संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत आणि स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक रविंद्र वाडकर यांनी स्पर्धेचे महत्व विषद करीत उरण तालुक्यातील मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, दिबा प्रेमीनी स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन केले.
भूमिपुत्र, शेतकरी, कामगार, कष्टकरी समाजाचे स्फूर्तीस्थान तथा लोकनेते दि बा पाटील यांचे कार्यकतृत्व संपूर्ण जगाला कळावे, या उद्देशाने नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने दि बा पाटील चळवळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी 8850315795/9821196575/
9004329457 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
……….
Be First to Comment