स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपची तिरंगा दुचाकीफेरी
शहरातील मुख्य रस्त्यावरुन भाजप युवा मोर्चाच्यावतीने तिरंगा दुचाकीफेरी काढण्यात आली.
पनवेल : स्वातंत्र्य दिनानिमित्त पनवेल तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने ध्वजारोहण व ध्वजवंदन समारंभांचा कार्यक्रम आटपल्यावर शहरातील मुख्य रस्त्यावरुन भाजप युवा मोर्चाच्यावतीने तिरंगा दुचाकीफेरी काढण्यात आली. भाजपचे आ. प्रशांत ठाकूर यांनी या फेरीचे नेतृत्व केले. शहरातील मार्केट यार्ड येथील श्री.
रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहातून निघालेल्या या फेरीमध्ये भारत मातेच्या जय जय काराच्या घोषणा देण्यात आल्या. पावसामध्येही ही फेरी न थांबता शहरातील रस्त्यावरुन काढण्यात आली. या फेरीमध्ये आ. ठाकूर यांच्यासोबत माजी सभागृहनेते परेश ठाकूर व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या दुचाकीफेरीचा समारोप शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास वंदन करुन शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला.
Be First to Comment