नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था आयोजित केलेल्या दि. बा. पाटील चळवळ स्पर्धेसाठी कृतज्ञता स्मरण सेवा देण्यासाठी वाशी येथे बैठक संम्पन्न !
नवी मुंबई, प्रतिनिधी : देशातील भूमिपुत्र व प्रकल्पबाधितांचे अर्ध्वयू लोकनेते दि. बा. पाटील यांच्या लोकसेवेसाठी समर्पित व संघर्षमय कार्यास उजाळा देऊन कलेच्या माध्यमातून मूलभूत हक्काची जाणीव व संघर्ष याबद्दल ऊर्जा प्रज्वलीत व्हावी व त्या माध्यमातून विद्यमान पिढीसह पुढील पिढीस संघर्षासाठी प्रेरीत करणे या उद्देशाने “ दि. बा. पाटील चळवळ स्पर्धा ” या स्फूर्तीदायी उपक्रमाचे आयोजन नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने केलेले.
या स्पर्धेसाठी संघर्षाचे ऊर्जास्थान-दि बा लोकनेते दिबांच्या दि बां ची विविध प्रकारची आंदोलने व सभागृहातील संसदीय कार्याचा जाज्वल्य इतिहास शोध, बोध घेऊन आर्टिकल (लेख) लिहिणे, व्हिज्युअल डॉक्युमेंटरी (माहितीपट) बनविणे, दि बां च्या संघर्षशील जीवनातील एखादे आंदोलन समोर ठेवून किंवा कार्याच्या महतीपर स्फुर्तीगीत (लेखन, व्हिडीओ, ऑडीओ) बनविणे, आंदोलनाची चित्र रेखाटने, लघुपट बनविणे, लघुपटाचे पोस्टर डिझाईन साकारणे या स्पर्धा अमर्याद ( राज्यासह देशातील सर्वांसाठी ) क्षेत्रासाठी असतील, तर यंदाच्या श्रीगणेशोत्सव काळात श्रींसमोर याच संदर्भित विषयांवर आरास देखावा करणे या स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी नवी मुंबई, रायगड, ठाणे जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातून अनेकांनी अर्ज केलेले आहेत. स्पर्धेच्या आयोजनाबाबत देखील विविध वृत्तपत्रांतून प्रसिद्धीपर जाहिराती तसेच नवी मुंबई क्षेत्रात बॅनर्स द्वारे पोहचण्याचा प्रयत्न संस्थेने केलेला आहे.
सदरच्या उपक्रमाची व्याप्ती लक्षात घेता हि स्पर्धा अधिक प्रभावीपणे जनसामान्यांपर्यंत पोहचून, अनेक शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी या स्पर्धेतील विविध गटांमध्ये आयोजित स्पर्धामध्ये सहभागी व्हावेत यासाठी लोकनेते दि. बा. पाटील यांनी दिलेल्या वैचारिक, सामाजिक, आर्थिक उन्नतीसह भूमिपुत्र म्हणून प्राप्त करून दिलेला अभिमान स्वाभिमानाच्या प्रति कृतज्ञ राहून कृतज्ञता स्मरण सेवा करण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची बैठक आज वाशी येथे संपन्न झाली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष व माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी नगरसेविका वैजयंती भगत, नवी मुंबईकरांना सर्वाभिमुख असलेले कवी, लेखक, नाटककार व पर्यावरण स्नेही व स्पर्धेचे संयोजन समितीचे सदस्य गजआनन म्हात्रे, समाजसेवक संदिप भगत, दि. बा. पाटील भूमिपुत्र ठेकेदार संघटना, नवी मुंबई चे अध्यक्ष जितेश म्हात्रे, संस्थेचे प्रवक्ते शैलेश घाग व वाशीगाव, सानपाडा आणि जुईनगर विभागातील दि. बां. च्या विचाराने प्रेरीत असलेले नागरिक उपस्थित होते.
स्पर्धेविषयक अधिक माहितीसाठी इच्छुक स्पर्धकांनी स्पर्धा व्यवस्थापक ऋतुजा भगत 8850315795 यांस संपर्क साधावा किंवा d.b.sphurtisthan@gmail.com या मेलवर, किंवा दि.बा. स्फूर्तीस्थान चळवळ स्पर्धा या फेसबुक पेज वर आणि sphurtisthan / दि. बा. स्फूर्तीस्थान स्पर्धा या इन्स्टाग्राम पेज वर संपर्क साधावा किंवा फॉलो करावे असे आवाहन श्री भगत यांनी केले आहे, अशी माहिती संस्थेचे प्रवक्ते शैलेश घाग यांनी दिली.






Be First to Comment