Press "Enter" to skip to content

स्वातंत्र्य दिनानिमित्त खारघर येथे राष्ट्र जागरण दीप यज्ञ !

स्वातंत्र्य दिनानिमित्त खारघर येथे
राष्ट्र जागरण दीप यज्ञ !

पनवेल, प्रतिनिधी : प्रॉलॉंग कोंपॉझिट्स* या कंपनीचे डायरेक्टर नंदन कुमार झा, संकल्प प्रतिष्ठान चे सचिव अजय माळी व अध्यक्ष राजेंद्र मांजरेकर तसेच दृष्टी फाउंडेशन च्या शोभा मिश्रा यांच्या पुढाकाराने भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त एक शाम भारत माता के नाम हा संगीत व नृत्याचा कार्यक्रम आणी गायत्री परिवारातर्फे देशाच्या उज्वल भविष्यासाठी राष्ट्र जागरण दीप यज्ञ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला स्वरांजली कल्चरल वेलफेअर असोसिएशनचे मनीष देसाई, नृत्यांजली ग्रुपच्या दीप्ती मसूरकर, गार्गी महिला मंडळ, अधिराज गार्डन मधील लिटिल वंडर्स मुलांचा डान्स, शंकरी मॅडम डान्स अकॅडमी अशा विविध संस्थानी या कार्यक्रमात सहभाग घेतला. अनेक श्रोत्यांनी सह भोजनाचा आनंद घेत कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक शिंदे सर यांनी केले तर प्रत्येक सहभागी कलाकारांना प्रशस्तीपत्रे व भेटवस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला आर के दिवाकर, राजेंद्र मांजरेकर, दीपक शिंदे, संतोष शर्मा, साधना पवार, मोना अडवाणी, बिना गोगरी, नेहा झा, नेत्रा पाटील, किरण पाटील, डॉक्टर विजय उजळंबे, संदीप कासार, अश्विनी भुवड, प्रिया दळवी, स्नेहल बुधाइ, नीलम विसपुते, निर्मला यादव, प्रीती शर्मा, मीनाक्षी अंथवाल, आरती शर्मा, सीमा खडसे, कल्पना गांधी, भावना मॅडम, गुडिया मिश्रा,आरती अगरवाल, एस.टी. कांबळे, धर्मेंद्र प्रधान, संजय महाडिक, अमित बुधाई, ए एन वर्मा, राजेश कुमार सिन्हा, एम.एच. गांधी, मनीष देसाई, नितीन जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published.