Press "Enter" to skip to content

खारघर येथील चौकाला वीर सावरकर यांचे नाव !

खारघर येथील चौकाला वीर सावरकर यांचे नाव !

पनवेल, प्रतिनिधी : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर सेक्टर 20 येथील चौकाचे वीर सावरकर असे नामकरण करण्यात आले. खारघर येथील वीर सावरकर प्रेमीनी सदर चौकाला नाव दिले आहे. भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, भाजप नेते किरण पाटील यांच्या शुभहस्ते सदर चौकाचे नामकरण करण्यात आले. यावेळी अनेक वीर सावरकर प्रेमी उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना खारघरवासियांकडून मानवंदना म्हणून येथील चौकाचे नामकरण केल्याची भावना यावेळी वीर सावरकर प्रेमी तथा जागृत फाउंडेशचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खरपूरिया यांनी कोकण दर्पणला दिली.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published.