पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महापालिकेला शासनाने योग्य जीएसटी अनुदान द्यावे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळात केली. पनवेल महानगरपालिकेची स्थापना २०१६ साली झाली. त्यानंतर जीएसटीचे अनुदान मिळावे यासाठी त्यावेळचे तत्कालीन आयुक्त यांनी शासनाकडे चुकीची कागदपत्रे दाखल केली. त्यामुळे जीएसटी अनुदान कमी मिळत होते. आणि आता त्यामध्ये आणखी कपात करण्यात आल्याने महानगरपालिकेचे प्रचंड नुकसान होत आहे. २८. ८९ कोटी रुपये ऐवजी ०७ कोटी त्यानंतर आता ते ०४ कोटी जीएसटी अनुदान शासनाने केले आहे. त्यामुळे महानगरपालिकेला प्रचंड आर्थिक संकटाला सामना करावा लागतो, त्यामुळे राज्य शासनाने पनवेल महानगरपालिकेला योग्य जीएसटी अनुदान देणे गरजेचे आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पॉईंट ऑफ इन्फर्मेशन नुसार माहिती वजा मुद्दा उपस्थित केला.

पनवेल महापालिकेला शासनाने योग्य जीएसटी अनुदान द्यावे : आमदार प्रशांत ठाकूर
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम
- 5 ऑगस्ट रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील पनवेलमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य ‘मूट कोर्ट’चा उद्घाटन समारंभ
- लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये “ऋतू हिरवा” अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन !
More from RaigadMore posts in Raigad »







