पनवेल : कोविड परिस्थितीत खचलेल्या उद्योग – व्यवसायांनी शिवरायांच्या प्रेरणेने उभारी घ्यावी, समाजाने अशा लहान मोठ्या उद्योजकांच्या पाठीशी उभे राहावे या हेतूने एमपॉवर – मराठ्यांचे महाकुटुंब कडून १२५ महिला उद्योजिकांचा राष्ट्रमाता जिजाऊंची प्रतिमा आणि सन्मानचिन्ह देऊन पनवेल मनपाचे आयुक्त गणेश देशमुख आणि शिवसेना पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे याच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
तुमच्या पाठीशी समाज आहे हा संदेश देण्यात आला. प्रशासकीय सेवा कृतज्ञता सन्मान सोहळा पोलीस उपायुक्त शिवराज पाटील , पोलीस उपायुक्त मुख्यालय नवी मुंबई अभिजित शिवथरे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पनवेल बालाजी वाघमारे , पोलीस निरीक्षक जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे समाजाला सतत सहकार्य होत असते. ही बांधिलकी अधिक दृढ करण्यासाठी एमपॉवर च्या वतीने प्रशासनात कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या शिवप्रतिमा आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
राज्य समन्वयक मराठा क्रांती मोर्चा विनोद साबळे, स्थायी समिती सदस्य गणेश कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहीर सुरेशराव सूर्यवंशी यांचा शिवरायांच्या पोवाड्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. लीना गरड नगरसेविका, नेत्रा किरण पाटील नगरसेविका, संजना समीर कदम नगरसेविका, डॉ कांचन ताई पाटील, ऍडव्होकेट सुलक्षणा जगदाळे, सुवर्णा वाळुंज यांच्या उपस्थितीत महिला मेळावा आणि हळदी कुंकू कार्यक्रम आणि महिलांसाठी भव्य लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात उद्योजकांनी आपल्या वस्तू आणि सेवा मोफत कुपन रूपाने दिल्या. कामोठे कॉलनी फोरमच्या वतीने १५० शिवचरित्र उपलब्ध करून दिले आणि त्याचे मुलांना लीना गरड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास महिला भगिनींचा उदंड प्रतिसाद लाभला. शिवजन्मोत्सवास पनवेल मधील राजकीय- सामाजिक आणि उद्योजकीय क्षेत्रात असणाऱ्या मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहून आयोजकांचे मनोबल वाढवले आणि शुभेच्छा दिल्या. पनवेल मनापाच विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे , डॉ अरुण भगत , नगरसेविका प्रीती जॉर्ज, सारिका भगत, सचिन लावंड, वीरेंद्र डोके , राहुल अग्रे , डॉ शिवाजी बेलोटे , महेंद्र दुदुस्कर , नितीन शेलार ,समाधान काशीद , नितीन कदम, विजय चव्हाण ,दशरथ पाटील सचिन वरंडे .विनायक दवंग तानाजी भोसले शिवाजी कदम मंगेश अधाव मंगेश पवार बबन खणसे विनायक पवार शैलेश ठूबे अल्पेष माने शहाजीराजे भोसले सर हे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वात महत्वाची जबाबदारी महिलांनी पार पडली. श्रीमती कांचन पाटील वडगावकर, श्रीमती सुलक्षणा जगदाळे,श्रीमती कांचन साबळे, श्रीमती मनीषा आग्रे, श्रीमती अनुजा शेलार, श्रीमती शर्मिला चव्हाण, श्रीमती आरती चव्हाण, श्रीमती अश्विनी डोके, *जयश्री पाटील, श्रीमती प्रियंका पवार,श्रीमती अश्विनी लावंड,श्रीमती अर्चना देवकर, श्रीमती मंजू पानमंद, श्रीमती योगिता इंगळे, श्रीमती नीलम पानमंद * श्रीमती शीतल मर्ढेकर, श्रीमती माधवी सावंत,श्रीमती नयना सावंत, श्रीमती प्रमिला चकवे,श्रीमती वैशाली खणसे, *श्रीमती मनीषा कोचळे, प्रज्ञा पाटील, सईराजे भोसले, विभावरी साबळे, यांचा सहभाग होता.