पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या खारघर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्यरुग्ण कक्ष सुरु करण्यात आला आहे. पनवेल मनपाचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या शुभेहस्ते तसेच महापौर डॉ कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर बाह्यरुग्ण कक्षाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थिती होते. स्थानिक नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्या सततच्या पाठपुराव्याची महापालिका प्रशासनाने दखल घेत बाह्यरुग्ण कक्ष सुरु केला.
यावेळी स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, अप्रभाग समिती सभापती संजना समीर कदम, नगरसेविका नेत्रा किरण पाटील, डॉ. अक्षता गोवारी, भाजप रायगड जिल्हा सचिव गीता चौधरी, भाजप खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.








