Press "Enter" to skip to content

पनवेलमधील कानपोली ग्रामपंचायतीतील भाजपच्या सरपंच विजया पाटील, उपसरपंच नागा गिरा यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश !

पनवेल : शिवसेना नेते व संपर्क नेते कोंकण विभाग तथा राज्याचे उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात असलेल्या कानपोली ग्रामपंचायतीमधील भाजपच्या सरपंच विजया पाटील, उपसरपंच नागा गिरा तसेच सदस्य आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.

शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाचा झंझावात संपूर्ण पनवेल आणि रायगड मध्ये सुरु आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सतत कार्यरत ठेवून पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहे. जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल यांच्या विशेष प्रयत्नाने ग्रामपंचायत कानपोली येथील भाजपच्या सरपंच विजया कैलास पाटील, उपसरपंच नागा गिरा, सदस्य हिरामण उघडा व त्याच्या सहकार्यानी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी रायगड उपजिल्हा संघटक परेश पाटील, पनवेल तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, तालुका सन्मवयक प्रदीप ठाकूर, पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे, तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे, उपशहर प्रमुख नविन पनवेल ज्ञानेश्वर भंडारी, शाखा प्रमुख कानपोली प्रदीप पाटील, शाखा प्रमुख वावंजे सतिश पाटील आदि पदाधिकारी उपस्थित होते.