Press "Enter" to skip to content

युथ कौन्सिल आयोजित व्हॉलिबॉल स्पर्धेत मुलींमध्ये आर.जे.सी. घाटकोपर संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर मुलांमध्ये खारघर फोरम संघ अव्वल !

पनवेल : खारघर युथ कौन्सिल सामाजिक संस्थेतर्फे ५ व ६ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या मुलांच्या व मुलींच्या भव्य व्हॉलिबॉल स्पर्धा पार पडल्या.

खारघर युथ कौन्सिल ही संस्था खारघरमध्ये सामाजिक, पर्यावरण, अरोग्य आदी क्षेञात कार्य करत आहे. त्यांनी मुलांसाठी खेळा व स्वस्थ रहा, मोबाईल टू मैदान या त्यांच्या अभियाना नुसार ५ व ६ फेब्रुवारी रोजी मुलांच्या व मुलींच्‍या भव्य व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेत १४ मुलांच्या व १० मुलींच्या संघाने सहभाग झा ल्या होता अशी माहिती संस्‍थेचे अधक्ष्य ज्ञानेश्वर सोरटे , सेक्रेटरी संदीप गोरे, खजिनदार दत्तात्रय पाटील,खेळ कमिटीचे मुख्य कुमार बंटी यांनी दिली..

मुलींमध्ये प्रथम क्रमांक – आर.जे.सी. घाटकोपर, द्वितीय क्रमांक- बालभारती खारघर तर मुलांमध्ये प्रथम क्रमांक – खारघर फोरम, द्वितीय क्रमांक – साऊथ सिक्स मुंबई या संघाने पटकावले. स्पर्धक बदलापुर तसेच तारापुरहुन आले होते. या स्‍पर्धेमध्ये पहिल्यांदाच मुलींचा सहभाग प्रेरणादायी होता, खेळामुळेच शरीर सुदृढ राहते. मुलींनी मैदानी खेळांबरोबरच इतर सर्व खेळांमध्‍येही सहभाग घेणे आवश्‍यक आहे तसेच मैदानी खेळ ही काळाची गरज आहे असे मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगीतले.
यावेळी संस्थेतील मान्यवर नंदू वारुंगसे, दिलीप मस्के, एस.पी. सिंग , कुंडलिक सरगर, अशोक गोळे, पांडुरंग घुले, आप्पा वाळुंज, अनिल शेटे, भास्कर ,एड. सुभाष नायर, रवी थोरपुझा तसेच सर्व राजकीय पक्षातील मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली व खारघर युथ कौन्सिल चे आभार मानले. यावेळी ग्राउंडचे सर्व काम कृष्णा,प्रशांत, करण, अक्षय घुले,मकरंद,देविदास,चिंतन, बिरेंद्र, भाविन तर अम्पायर म्हणून घनश्याम सावंत, प्रवीण जाधव, आकाश चव्हाण ,सुभाष नायर,श्रीकांत लाईन अम्पायर म्हणून अनिकेत,आफताब,सोनू, बेनी(चाको),प्रतीक,संतोष मोरे तसेच कॉमेंट्रेटर म्हणून मंदार, मनीष सिंह यांनी भूमिका पार पाडली.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »