Press "Enter" to skip to content

महिला सक्षमीकरणासाठी काँग्रेसचे इंदिराशक्तीॲप ! जागतिक महिला दिनी होणार उद्घाटन !

मुंबई : आझाद मैदान मुंबई काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयामध्ये अनुसूचित जाती कमिटी काँग्रेसच्या वतीने एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस अनुसूचित जाती कमिटी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजेश लीलोठीया, महाराष्ट्र काँग्रेस अनुसूचित जाती कमिटी प्रभारी मनोज बागडी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुसूचित जाती कमिटी सिद्धार्थ हत्तीअंबीरे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक सुनिलभाऊ सावर्डेकर तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला इत्यादी मान्यवर उपस्थित होते या बैठकीत महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्या संरक्षणासाठी #इंदिराशक्तीॲप ची निर्मिती करण्यात आली असून जागतिक महिला दिन ८ मार्च रोजी या अँपचे उद्घाटन केले जाणार असून भारतातील महिलांना आपल्या संरक्षण करण्यासाठी हा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे राजेश लिलोठीया यांनी सांगितले. तसेच ८५ टक्के असणाऱ्या बहुजन समाजाला एकसंघ बांधण्यासाठी अनुसूचित जाती , जमाती ,ओबीसी आणि अल्पसंख्यांक अशा समूहांची कमीत कमी अकरा लोकांची कार्यकारिणी तयार करून सर्वाचा सहभाग अशा प्रकारची कमिटी स्थापन करण्याचे ठरले असून महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्षांनी तीन दिवसांमध्ये या सदभावना समितीची कार्यकारिणी पाठवण्याचं आवाहन म. राजेश यांनी केले. दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार संदर्भातल्या असणाऱ्या दलित अन्याय अत्याचार कायदा व त्याची होणारी अंमलबजावणी हे प्रभावी होते की नाही हे पाहण्यासाठी व कडक अंमलबजावणी व्हावी या हेतूने सर्व अनुसूचित जाती जमाती कार्यकर्त्यांनी एकसंघ होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले या बैठकीला संपूर्ण राज्यातून जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष,तालुक्यातून विविध कार्यकारी ,पदाधिकारी उपस्थित होते. त्यागमूर्ती मातारमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबई येथे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.राजेश जी लिलोठिया यांच्या उपस्थितीत मुंबई काँग्रेस कार्यालयात त्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष मा.सिद्धार्थभाऊ हत्तीअंभिरे , महाराष्ट्र प्रभारी मा.मनोज जी बागडी, मुंबई अनु.जाती विभागाचे अध्यक्ष मा.रमेश कांबळे, महाराष्ट्र प्रदेश अ.जा.क समन्वयक सुनिलभाऊ सावर्डेकर, मुंबई अनु.जाती विभागाचे माजी अध्यक्ष मा.कचरू यादव ,अनुसूचित जाती विभागाचे सर्व जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष व राज्य समन्वयक यांच्यासह काँग्रेस नेते मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.

More from MumbaiMore posts in Mumbai »