Press "Enter" to skip to content

जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्या नेतृत्वाखाली नेरुळ व जुईनगर येथील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला.
नेरुळ श्री गणेश सोसायटीमधील जिल्हाध्यक्ष कार्यालयामध्ये भारतीताई जाधव , शांताताई पाटील आणि जुईनगर मधील अनेक महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला.
सदर कार्यक्रमाच्या वेळेस जुईनगर तालुकाध्यक्ष सचिन पाटील, सानपाडा तालुका अध्यक्ष रवी ढोबळे, मंगेश रहाटे जुईनगर उपाध्यक्ष, कामगार सेल जिल्हाध्यक्ष बाळू जरे, वार्ड क्रमांक 84 युवक अध्यक्ष वैभव रामपुरे, जुईनगर युवक तालुकाध्यक्ष हर्षद जगताप, युवक जिल्हा उपाध्यक्ष रुपेश गायकवाड, वार्ड क्रमांक 84 सचिव प्रकाश धुमाळ, वार्ड क्रमांक 84 उपाध्यक्ष बाबासो हजारे, वार्ड क्रमांक 84 अध्यक्ष गजानन टाळे, तालुका उपाध्यक्ष गणेश राऊत राय, वाट 84 युवक उपाध्यक्ष सलीम मेहमूद शेख, महिला जिल्हा उपाध्यक्षा सौ साधना बर्गे, बेलापूर विधानसभा उपाध्यक्षा सौ सोनाली उदमले, महिला तालुकाध्यक्षा सौ रेखा रणसिंग, युवती तालुका अध्यक्षा कुमारी स्मिता मोरे, श्री रवी कमलनाथन, श्री शुभम भालेराव इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.