पनवेल : शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली शेकापच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
खारघर येथील शेतकरी कामगार पक्षाचे ओवे कॅम्प गाव अध्यक्ष लक्ष्मण गोविंद भातोसे यांच्या सह शेकडो कार्यकत्यांनी हाती शिवबंधन बांधत शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.
यावेळी शिवसेना महानगर प्रमुख रामदास शेवाळे, महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, तालुका प्रमुख पनवेल ग्रामीण ज्ञानेश्वर बडे, उपमहानगर प्रमुख दिपक परत, नवीन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुख, पनवेल शहर प्रमुख प्रविण जाधव, खारघर शहर प्रमुख प्रकाश गायकवाड, उपशहर प्रमुख वैभव दळवी, ज्ञानेश्वर भंडारी, विभाग प्रमुख किरण सोनवणे, नितिन सूर्यवंशी, उपविभाग प्रमुख प्रशांत जाधव, उ.भा. सेल महानगर अध्यक्ष गिरीश गुप्ता, शाखा प्रमुख सचिन ठाकूर आदि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








