पनवेल : संपूर्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रात संघटनेचा विस्तार करण्यासाठी नवीन शाखा सुरू करण्याची मोहीम कॉलनी फोरमने हाती घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर खारघर कॉलनी फोरमने खारघर शहरात आणखी दोन शाखा सुरू केल्या आहेत.
नवीन शाखांचे उदघाटन खारघर कॉलनी फोरमच्या अध्यक्षा तथा पनवेल महापालिका नगरसेविका लीना अर्जुन गरड यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. खारघर सेक्टर ११ आणि खारघर सेक्टर १२ येथे सदर कार्यालये असून त्यामाध्यमातून जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार फॉरमने केला आहे.
यावेळी खारघर कॉलनी फोरमच्या समन्वयक अनिता बाबासाहेब पाटील, फोरमचे नेते मधू पाटील, ऍड बालेश भोजणे, प्रा. मिलिंद ठोकळे तसेच खारघर कॉलनी फोरमचे अनेक पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.
कॉलनी फोरमच्या खारघरमध्ये आणखी दोन शाखा ! लीना गरड यांच्या शुभहस्ते नूतन कार्यालयाचे उदघाटन !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
More from RaigadMore posts in Raigad »