पनवेल : खारघर सेक्टर १२ मधील जी टाइपमध्ये स्मितल सोसायटी (प्लॉट नंबर १३५) मध्ये एक आठवड्यापासून, नूतन सोसायटी (प्लॉट नंबर १३६), निशिगंधा सोसायटी (प्लॉट नंबर १३७) व त्यासमोरील रो हाऊसेसमध्ये दोन दिवसांपासून दुर्गंधीयुक्त दूषित व पिण्यासाठी अयोग्य पाणी येत असल्याची तक्रार आल्यानंतर स्थानिक नगरसेवक रामजी बेरा, नगरसेवक शत्रुघ्न काकडे, खारघर मंडल सरचिटणीस दीपक शिंदे, युवा सरचिटणीस अमर उपाध्याय यांनी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी चेतन देवरे यांच्याशी संपर्क साधून तक्रार पत्र देऊन या गंभीर प्रकरणाची समस्या निदर्शनास आणून दिली. मागील तीन चार दिवसांपासून परिसरातील अनेक नागरिक या दूषित पाण्यामुळे आजारी पडले आहेत. त्यामुळे त्यांच्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. अधिकारी चेतन देवरे यांनी लवकरात लवकर तांत्रिक दोष शोधून यावर मार्ग काढला जाईल असे आश्वासन देऊन तात्पुरत्या टँकरची व्यवस्था करून दिली आहे.
सरचिटणीस दीपक शिंदे यांनी या परिसरातील व्यक्तींना काही दिवस पाणी उकळून प्यावे जेणेकरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही असे आवाहन करण्यासाठी सिडको अधिकाऱ्यांना विनंती केली आहे.

दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम
More from RaigadMore posts in Raigad »







