Press "Enter" to skip to content

“लोकांनी न पाहिलेले प्रितम दादा…”

“लोकांनी न पाहिलेले प्रितम दादा…”( या लेखाचे लेखक शेतकरी कामगार पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत )

     गेली बावीस वर्षे मी शेतकरी कामगार पक्षामध्ये एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय. अकरावी मध्ये शाळेतील पुरोगामी विद्यार्थी संघटनेपासून मी काम करायला सुरुवात केली. या बावीस वर्षात शे.का. पक्षात अनेक सर्वसामान्य कार्यकर्ते दादा झाले, भाई झाले पण, पक्षाची उतरती कळा पाहून पक्षावर दोषारोप ठेवत इतर पक्षात गेले परंतु त्यावेळी पनवेल नगरपरिषदेचे तत्कालीन नगराध्यक्ष श्री जे. एम. म्हात्रे साहेब हे शेतकरी कामगार पक्षात होते आणि आजही ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या समाज कार्याचा वारसा पुढे खंबीरपणे चालवणारे त्यांचे सुपुत्र कॉलेज दिवसांमधील जनरल सेक्रेटरी ते पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते असा राजकीय प्रवास करणारे श्री प्रीतम दादा म्हात्रे यांच्या सोबत गेली बारा वर्षे मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत आहे. दादांचे काम करतानाचे बरेचसे पैलू लोकांसमोर नाहीत. मग ते सामाजिक असो किंवा सांस्कृतिक. लोकांसमोर आहेत ते फक्त विरोधी पक्षनेते श्री प्रीतम दादा म्हात्रे,
    परंतु प्रीतम दादा या शब्दातला दादामाणूस समाजकारणातील मी जवळून पाहिला आहे . वेळोवेळी मनाने एकदम भाऊक.  कोणीही दादा जवळ आला आणि रिकामे हाताने गेला असे कधी घडले नाही. मग ती मुंबई मधून आलेली एकविरेची पायी दिंडी असो किंवा  जळगाव मधील आश्रमातील मुलांच्यासाठी वैद्यकीय सेवेची मागणी असो दादांनी सर्वांना सहकार्य केले करत आहेत आणि यापुढेही करत राहतील मग त्यामध्ये ती व्यक्ती सध्या किंवा भविष्य आपल्याला राजकारणात उपयोगी पडणार आहे की नाही याचा कुठेही त्याचा विचार नसतो. कोविड काळात फक्त पनवेल मध्येच नाही तर सबंध रायगड जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी शासकीय यंत्रणा पोहचली नव्हती आणि ती गोष्ट तेथील सामाजिक कार्यकर्त्यांकडून दादा जवळ आली तेव्हा क्षणाचाही विलंब न करता "मंगेश तू तिथे स्वतः जा, नीट पहा आणि लोकांपर्यंत आवश्यक त्या वस्तू पोहोचतील यात लक्ष दे अशाप्रकारे एक आपुलकीचा हात देणारे दादा."
     बऱ्याच रुग्णांना कोविड काळात रेमदेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत नव्हते अशा प्रसंगी शेवटच्या स्टेजला असणाऱ्या रुग्णांना मिळेल त्या ठिकाणाहून मिळेल त्या किमतीत आपल्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून इंजेक्शन उपलब्ध करून दादांनी अनेकांना सहकार्य केले परंतु कुठेही त्या गोष्टीचा गाजावाजा केला नाही.
    मी स्वतः कोराना पॉझिटिव्ह होतो त्यावेळी  पनवेल शहर हे रायगड जिल्ह्यामधील मुख्य शहर असल्यामुळे सर्व पेशंट पनवेल शहरांमधील हॉस्पिटलमध्ये दाखल होतो ते वेगवेगळ्या ग्रामीण भागातून पनवेल मध्ये येत होते. मी स्वतः दाखल असलेला हॉस्पिटल मध्ये सुद्धा रुग्णां सोबत आलेल्या पेशंटची जेवणाची वाताहात स्वतः पाहिली, परंतु स्वतः ऍडमिट असल्यामुळे मी बाहेर हॉस्पिटलच्या पडू शकत नव्हतो सदरची गोष्ट मी दादांना फोन द्वारे सांगितली त्वरित त्याच दुपारपासून दादांनी त्यांची वैयक्तिक जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेची यंत्रणा कार्यान्वित करून पनवेल शहरांमधील आवश्यक त्या रुग्णांच्या नातेवाइकांना हॉस्पिटलमध्ये दोन्ही वेळी पोळी-भाजी पोहोचवण्याची सुविधा सुरुवात केली तसेच घरी असणाऱ्या रुग्णांना सुद्धा आवश्यक त्या ठिकाणी दोन वेळ पोळी भाजी आणि फळे असा आहार मोफत पोचवण्याचा उपक्रम सुरू केला. तो पुढे काही महिने अविरत चालू होता हे सांगायला मला अभिमान वाटतो.
   ग्रामीण भागातून शहरात पोहचेपर्यंत च्या प्रवासादरम्यान ऑक्सिजन कमतरतेमुळे रुग्णांची दगावण्याची संख्या वाढत होती ही गंभीर गोष्ट लक्षात घेऊन दादांनी पनवेल आणि उरण तालुक्यातील आवश्यक त्या लांबच्या सर्व ग्रामपंचायतींना आणि हो तिथे कोणताही पक्षभेद न करता सरसकट सर्वांना आवश्यक ते पोर्टेबल ऑक्सिजन कॅन मोफत उपलब्ध करून दिले.
  कोरोना काळात लोक घरातून बाहेर पडत नव्हती अशा परिस्थितीत पनवेल परिसरातील आपल्या सर्व वृद्धाश्रमांना ऑक्सीजन कॅन तसेच आवश्यक त्या ठिकाणी आवश्यक तेवढे धान्याची उपलब्धता करून दिली.
     मला सांगायला अभिमान वाटतो पहिल्या टर्म मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्यापासून सुरू केलेली मोफत टॅंकर सुविधाही या क्षणापर्यंत अविरत सुरु आहे आणि यापुढेही अविरतपणे सुरू राहील.

आज अनेक लोकांना शाळेमधील फी भरण्यास सहकार्य असू दे किंवा हॉस्पिटलमधील बिल भरण्यास मदत असू दे दादां पर्यंत आलेली कोणतीही व्यक्ती निराश होऊन गेलेली नाही हे मी स्वतः पाहिले आहे . हे पाहत असताना स्वपक्षीय सोबतच इतर पक्षातील लोकांनासुद्धा दादा त्याच दृष्टिकोनातून सहकार्य करतात.
राजकारणात दादांनी बरेच उतार-चढाव पाहिले आहेत ज्या लोकांना जे एम म्हात्रे साहेबांनी साधारण कार्यकर्त्या पासून मोठे बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर केले ती लोक सुद्धा वेळेला स्वार्थापायी पक्षांतर करून इतर पक्षात निघून गेली परंतु भाऊंनी केलेले समाजकार्य हे पनवेल ची जनता विसरली नाही आणि त्यांनी दुसऱ्या टर्ममध्ये सुद्धा प्रीतम दादांना नगरसेवक म्हणून निवडून दिले हीच त्यांच्या कामाची पोचपावती..
बोलण्यासारखे बरेच काही आहे परंतु दादांसोबत राहून एक शिकलो की,
तीन गोष्टींचा नेहमी त्याग करा,
एक म्हणजे मोठेपणा,
दुसरा म्हणजे खोटेपणा ,
आणि तिसरा म्हणजे राजकारण ..!
हे सूत्र जर आपण पाळले तर आपण नेहमीच लोकांच्या मनात राहतो जसे आपले प्रितम दादा.

मंगेश अशोक अपराज
कार्यकर्ता,
शेतकरी कामगार पक्ष
(लाल सलाम)